Physics, asked by savitatehre111, 11 months ago

SSC BOARD राज्यशास्त्र महत्वाचे प्रश्न कृपया लवकरात लवकर पाठवा ......​

Answers

Answered by varadad25
4

इयत्ता दहावी राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न

प्रकरण 1

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

1 माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

2 सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात.

टिपा लिहा.

1 हक्काधारित दृष्टिकोन

2 राखीव जागांविषयक धोरण

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1 मतदाराचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?

2 सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे लोकशाहीतील महत्त्व स्पष्ट करा.

3 संविधानाने अल्पसंख्याकविषयी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा.

प्रकरण 2

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

1 निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

2 निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या सर्वांना निवडणूक लढवता येते.

टिपा लिहा.

1 निवडणूक आयोग

2 मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1 निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. *

2 मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारीही. याविषयी तुम्ही काय कराल?

3 मतदारांसाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल?

4 निवडणूक प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा.

प्रकरण 3

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

1 राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.

2 सत्तास्पर्धेत एक पक्ष असतो व त्याचा प्रभाव असतो, ती ‘बहुपक्ष पद्धती’ होय.

टिपा लिहा.

1 राष्ट्रीय पक्ष

2 पक्षविरहित लोकशाही

3 प्रादेशिक पक्षांच्या मान्यतेचे निकष

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1 राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. *

2 पक्षाचा जनाधार कशास म्हणतात?

3 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची धोरणे स्पष्ट करा.

4 आधुनिक काळातील पक्ष विरहित लोकशाहीचे परिणाम स्पष्ट करा.

प्रकरण 4

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

1 ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

2 राजकीय पक्ष एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करतात. *

3 एखाद्या चळवळीचे फक्त एकच उद्दिष्ट असते.

टिपा लिहा.

1 चळवळ

2 कामगार चळवळ

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1 भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

2 आदिवासी चळवळीच्या मागण्या स्पष्ट करा.

3 तुम्ही ऐकलेल्या चळवळीचे थोडक्यात वर्णन करा.

4 सामाजिक प्रश्न चळवळ न करता सोडवले जाऊ शकतात. याविषयी तुमचे मत मांडा.

प्रकरण 5

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

1 निवडणूकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

2 जमातवाद हा फक्त समाजापुरता मर्यादित असतो.

3 लोकशाही राज्यव्यवस्था सर्व काही राज्यव्यवस्थांपेक्षा श्रेष्ठ असते.

टिपा लिहा.

1 लोकशाहीसमोरील आव्हाने

2 भ्रष्टाचार

3 लोकशाही मूल्ये

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1 राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?

2 जागतिक पातळीवरील लोकशाही समोरील आव्हाने कशी रोखता येतील?

3 लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?

4 भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना सुचवाल?

5 लोकशाहीला पूरक ठरणारे कोणते उपक्रम शासनाने हाती घेतले आहेत?

Answered by nitinkhairnar538
0

सर्व समावेश लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात

Similar questions