English, asked by jagdish101660, 9 months ago

STORY IN MARATHI मिडस राजा ----- सोनाच्य लोभ ---------- कन्या MARK AS BRAINLIEST

Answers

Answered by Ayutam21
1

Answer:

मानवी दुःखाचे मूळ कारण त्याची विचारसरणी असल्याचे सांगण्यात येते. व्यक्तीचे आचरण स्वच्छ असेल, व्यक्ती सुसंस्कारी असेल तसेच थोडक्यात गोडी असावी, अशा विचाराची असेल, तर जीवन आनंददायी होते. कलुषित तसेच विकृत विचार आणि आचरण केव्हाही सुखाचा अनुभव देऊ शकत नाही. मानवी जीवनात सुखाचा शोध हा कस्तुरीसारखा आहे. सुख हे माणसाच्या मनात, विचारात आणि मानण्यात असते. मात्र, तुज आहे तुजपाशी, परी जागा चुकलासी याप्रमाणे त्याचा अनुभव आपण घेऊ शकत नाही, हे आपले दुर्दैव आहे.

प्राचीन काळात मिडास नावाचा राजा होता. या राजाला सोन्याच्या वस्तूंची खूपच आवड होती. सोन्याची वस्तू पाहिली की, तो खूप आनंदीत व्हायचा. आपल्याकडे सर्व गोष्टी सोन्याच्या हव्यात, अशी त्याची धारणा होती. एका रात्री देवाने त्याच्या स्वप्नात येत इच्छित वरदान मागायला सांगितले. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा आसुसला होता. तात्काळ त्याने ज्या गोष्टीला हात लावेन, त्याचे सोने होईल, असे वरदान मिळण्याची इच्छा प्रकट केली. देवाने त्याची इच्छा पूर्ण केली.

हात लावेन ती गोष्टी सोन्याची होणार, या विचाराने राजा अत्यंत आनंदात होता. एवढ्यात त्याची मुलगी धावत-धावत त्याच्यापाशी आली आणि त्याला बिलगली. मुलीला आलिंगन देताच ती लहानगी सोन्याची बाहुली बनली. मुलीचे हसू एकदम बंद झाल्यावर राजा दुःखी, कष्टी झाला. आपल्याला मिळालेल्या वरदानाचा इतका वाईट परिणाम होईल, हे त्याच्या ध्यानी-मनी नव्हते. देवाकडून मागितलेल्या वरदानाबद्दल त्याला आता पश्चाताप होऊ लागला. 

दुसऱ्या दिवशी पुन्हा देवाने स्वप्नात दर्शन दिले आणि इच्छित वरदान मागायला सांगितले. राजाने क्षणाचाही विलंब न करता हात लावेन ती गोष्ट सोन्याची होईल, हे वरदान परत घेण्याची विनंती केली. देवाने त्याची इच्छा पूर्ण केली. राजाने आपल्या चिमुकलीला स्पर्श केला आणि ती पूर्ववत होऊन पुन्हा हसू, बागडू लागली. राजा पुन्हा आनंदी झाला. 

खरे पाहता, या वास्तविक जगात मिडास राजासारखी अनेक माणसे आहेत, ज्यांना भौतिक सुखाची लालसा असते. माणूस जन्माला आला की, न संपणाऱ्या इच्छा, आशा-आकांक्षाचा, मोहाचा प्रवासही सुरू होतो. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत भौतिक सुखाची मोह-माया माणसाचा पिच्छा सोडत नाही. अशा वेळी प्रश्न पडतो की, या मानवी जीवनात नक्की सुख कशाला म्हणायचे?, यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, खऱ्या आणि वास्तविक सुखाच्या प्राप्तिचा मार्ग कोणता?

भूतलावरील आदिकालापासून सुखाची प्राप्ती नक्की कोणत्या मार्गाने होते, याचे मोठे कोडे आहे. कारण भौतिक सुविधा आणि संसाधनांची उपलब्धता यामध्ये सुख कुठेही आढळत नाही. वास्तविक पाहता, व्यक्तीच्या मानसिकतेवर सुखाची परिभाषा अवलंबून आहे.

तसे पाहता, मनःशांती आणि चित्त यावर सुखाचा अनुभव माणूस कसा घेतो, हे ठरते. षड्विकारांवर विजय आणि संसारिक लालसेतून मुक्तता यानंतर खरे सुख प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. आभासी जगात सुखवस्तूंचा शोध घेणे, म्हणजे वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासारखे आहे. असा शोध म्हणजे मृगजळासाठी धडपड करण्यापलीकडे काही नाही. 

मानवी दुःखाचे मूळ कारण त्याची विचारसरणी असल्याचे सांगण्यात येते. व्यक्तीचे आचरण स्वच्छ असेल, व्यक्ती सुसंस्कारी असेल तसेच थोडक्यात गोडी असावी, अशा विचाराची असेल, तर जीवन आनंददायी होते. कलुषित तसेच विकृत विचार आणि आचरण केव्हाही सुखाचा अनुभव देऊ शकत नाही. मानवी जीवनात सुखाचा शोध हा कस्तुरीसारखा आहे. सुख हे माणसाच्या मनात, विचारात आणि मानण्यात असते. मात्र, तुज आहे तुजपाशी, परी जागा चुकलासी याप्रमाणे त्याचा अनुभव आपण घेऊ शकत नाही, हे आपले दुर्दैव आहे. 

Similar questions