story writing in marathi 'आतला आवाज '
Answers
Explanation:
तिसरीमध्ये असताना डॉक्टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्यावर ताण देऊ नका’; पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी मानसीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या. आपल्या मुलांसाठी वेळ न देणाऱ्या, स्वत:च्या करिअरला प्राधान्य देणाऱ्या त्या तमाम आई-बाबांसाठी ऊर्मिला आणि त्यांचे पती राजेंद्र हे दोघंही एक आयडॉल आहेत. प्रत्येक घरात अशा ऊर्मिला आणि राजेंद्र पुढं येऊन गड सांभाळणार नाहीत; पण त्यांच्यासारखं आपल्या मुलासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?मी सोलापूर दौऱ्यावर असताना रविवारी सकाळीच रा. रं. बोराडे सरांचा फोन आला. लेखाचं कौतुक करत होते. सूचनाही करत होते. बोराडे सरांची ओळख तशी अलीकडची; पण त्यांनी दिलेल्या सूचना, अधिकारवाणीनं सांगितलेले अनेक बदल यावरून त्यांची आणि माझी ओळख खूप वर्षांपासूनची आहे, असं मला वाटत असतं. फोन ठेवताना ते म्हणाले : ‘‘तू सोलापूरला जाशील, तेव्हा ऊर्मिला आगरकर या महिलेला भेट. तुला त्या निमित्तानं वेगळा विषय हाताळता येईल.’’ मी त्यांना लगेच म्हणालो : ‘‘अहो सर, मी तर सोलापूरलाच आहे.’’ सर म्हणाले : ‘‘ठीक आहे, मग तू भेट ऊर्मिलाला.’’ ऊर्मिला यांच्याविषयी सरांनी मला बरंच काही सांगितलं होतं, त्यामुळे त्यांना भेटायची उत्सुकता फार लागली होती. बोराडे सरांनीच मला ऊर्मिला यांचा संपर्क नंबर पाठवून दिला. त्यांच्याशी बोलणंही झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचा बेतही आखला गेला. ठरल्याप्रमाणं मी त्यांच्या घरी पोचलो. घरासमोर एक सुंदर रांगोळी काढली होती, मी ती रांगोळी पाहत होतो. बेल वाजवली, आतमध्ये प्रवेश झाला. ऊर्मिला माझ्यासमोरून थोड्याशा दूर झाल्या, तशी माझी नजर घरात असणाऱ्या अनेक पुरस्कारांवर पडली. ‘आई पुरस्कार’, ‘माता पुरस्कार’, ‘उत्कृष्ट लेखन पुरस्कार’; उत्कृष्ट हस्ताक्षर, लेखन अशा कितीतरी स्पर्धांचे पुरस्कार आणि पारितोषिकं माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती. ऊर्मिला आगरकर (संपर्क नंबर: ९३७०४०८५३५)यांचे पती राजेंद्र आगरकर यांनीही माझं स्वागत केलं. बोलता आणि ऐकू येत नसलेली ऊर्मिला यांची मुलगी मानसी हीदेखील माझ्या बाजूला येऊन बसली. कदाचित मी कोण आहे हे ऊर्मिला यांनी अगोदरच मानसीला सांगितलं असावं. माझी ओळख, त्यांची ओळख असा सगळा आमचा प्रथम परिचयाचा कार्यक्रम संपला होता. मानसी आतमध्ये गेली आणि तिनं तिचे आत्तापर्यंतचे काही जुने अल्बम माझ्यासमोर आणून ठेवले. रांगोळी, टाकाऊ वस्तूपासून वेगवेगळ्या देखण्या वस्तूंची निर्मिती, ऑनलाईन दागिने विकण्याचं मानसीनं हाती घेतलेलं काम हे सगळं त्या अल्बममधून मला दिसत होतं. मानसीच्या आई ऊर्मिला यांनी मानसी जन्मल्यापासून आतापर्यंतचा सगळा प्रवास माझ्यासमोर ठेवला. हा सगळा प्रवास त्यांनी ‘मनीमानसी’ या पुस्तकातही मांडलाय. आपल्या मुलींसाठी ऊर्मिला यांनी जे काही केलं, ते कुठल्याही आईला किती जमेल किंवा एखादी आई ऊर्मिला होण्यासाठी इतक्या हिरिरीनं पुढं येईल का, हा माझा मला स्वत:लाच पडलेला प्रश्न आहे. मानसी सध्या बॅंकिंग अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तिचं शिक्षण बी. ई. कॉम्प्युटर सायन्स झालंय. त्यामध्ये तिला ७० टक्के, डिप्लोमाला ८० टक्के,नको, कोणाच्या तरी मदतीशिवाय ती आपलं आयुष्य स्वत: ताठपणे उभे राहून जगली पाहिजे,’ हीच भूमिका घेऊन ऊर्मिला कामाला लागल्या. गेल्या काही वर्षांमध्ये ऊर्मिला यांनी जे काही केलं, त्याला आता खूप यश आलं आहे. त्यात ऊर्मिला आणि त्यांचे पती राजेंद्र यांच्या उमेदीचे सगळे दिवस निघून गेले. मात्र, आज मानसीच्या रूपानं तयार झालेली ‘सुपर’ मुलगी माझ्यासमोर उभी होती. मूकबधिरांशी संबंधित असलेलं सगळं प्रशिक्षण ऊर्मिलानं घेतलं. मुंबईच्या ‘सेंट्रल स्कूल ऑफ डेफ’मध्ये तीन वर्षं काढून अगोदर मूकबधिरांची सगळी शास्त्रीय भाषा ऊर्मिला शिकल्या आणि मग हळूहळू ती सगळी भाषा ऊर्मिला यांनी मानसीला शिकवली. ऊर्मिला यांच्या आयुष्याचा खूप काळ मूकबधिरांची शास्त्रीय भाषा शिकून घेण्यामध्ये गेला. मानसीचा भाऊ निखिल याची पूर्ण जबाबदारी ऊर्मिलाचे पती राजेंद्र यांनी स्वीकारली होती, ते सोलापूरलाच राहत होते. आहे ते सगळं विकून आपल्या दोन्ही मुलांच्या आयुष्यासाठी हे पती-पत्नी कामाला लागले होते. निखिल बी. ई. पदवीमध्ये विद्यापीठात पहिला आला. परदेशामध्ये स्कॉलरशिप मिळावी म्हणून प्रयत्न करत होता; पण बराक ओबामा यांच्या काळात भारतीयांना मिळणाऱ्या संपूर्ण स्कॉलरशिप बंद करण्यात आल्या होत्या. निखिल आता परदेशात आहे. तिथं तो जॉब करतोय. त्याची परदेशात जाऊन सेटल होण्याची फार इच्छा होती. परदेशातलं शिक्षण घेताना तो अमेरिकेमधल्या एका मंदिरात राहिला. मंदिरात लोकांकडून मिळणाऱ्या अन्नावर त्यानं आपली गुजराण केली. आपली जिद्द त्यानं सोडली नाही. तो शेवटी शिक्षण पूर्ण करून अमेरिकेमध्ये सेटल झाला. आता त्याच्या जीवावर घराचा अख्खा गाडा चालतोय. ‘‘मानसीचं करता करता निखिल कधी मोठा झाला, हे मला कळलंच नाही. एक आई म्हणून माझ्या पोराला माझं प्रेम देता आलं नाही. तदहावीला ८१; तर पहिलीला ९८ टक्के होते. मानसीला जन्मतःच वाचादोष आणि श्रवणदोष आहे; पण आताच्या सगळ्या धष्टपुष्ट असलेल्या आणि सर्वगुणसंपन्न असलेल्या, सगळं जमत असलेल्या मुलींना तिनं मागं टाकलंय. तिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास, एवढी ऊर्जा आणि एवढं हत्तीचं बळ आलं कुठून, हा प्रश्न मलाही पडला होता. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मानसीच्या आई देत होत्या. मानसी एकीकडं वाढत होती; तर दुसरीकडं तिच्या आई-बाबांची काळजी वाढत होती. तीन वर्षांनंतर त्यांच्या लक्षात आलं, की आपली मुलगी आता बोलूच शकत नाही आणि तिला ऐकायलाही येत नाही. सर्व वैद्यकीय इलाज करून बघितले; पण काही उपयोग झाला नाही. आपलं बाळ