India Languages, asked by Ramziii8846, 9 months ago

Stree+ha+kutumb+sansthecha+kana..give+150+word+essay+in+marathi..

Answers

Answered by itzJitesh
1

Answer:

‘स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असते. तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे,’ असे मत जिजाई महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई नारायण राणे यांनी शुक्रवारी मांडले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘प्रहार’ कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त केले.

‘महिलांच्या स्थितीमध्ये गेल्या तीस-पस्तीस वर्षात खूप फरक पडलाय. हा फरक चांगला आहे, परंतु महिलांचे प्रश्न संपले आहेत असे नव्हे. आज मी जास्त वेळ कोकणात असते, तिथे मी जाते तेव्हा पाहते की, अजूनही महिलांच्या आर्थिक व कौटुंबिक समस्या सुटलेल्या नाहीत. कारण महिलांना घरातून फारसा पाठिंबा मिळत नाही. त्यांना घराबाहेर पडायला मिळत नाही. घरात राहून संसार सांभाळावा लागतो. त्यांना वाचनाला वेळ मिळत नाही. असे असले तरी त्या हुशार आहेत, कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द त्यांच्यात आहे,’ या शब्दांत सौ. राणे यांनी महिलांचे कौतुकही केले.

जागतिक महिला दिनानिमित्त ‘प्रहार’च्या कार्यालयात झालेल्या या खास कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रमुख संपादक मीनल बाघेल, डबिंग आर्टिस्ट प्राची सावे-साथी, अनेक वाद्य वाजवणा-या प्रतीक्षा चिंदरकर, ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे आणि व्यवस्थापक मनीष राणे तसेच ‘प्रहार’मधील सहकारी उपस्थित होते. बाघेल यांनी महिला पत्रकार आणि एकूणच पत्रकारितेच्या स्थितीबाबत उपस्थितांबरोबर मनमोकळा संवाद साधला, तर प्राची सावे-साथी आणि प्रतीक्षा चिंदरकर यांनी आपल्या कला सादर केल्या.

कुटुंब हे स्त्रीवरच अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम होते. म्हणून स्त्रीला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनी आपल्या सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा. -सौ. निलमताई राणे, जिजाई महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा

आजवर अनेक वृत्तपत्रांत महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळलेल्या बाघेल यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीतील आपले अनुभव कथन करतानाच, या क्षेत्रात महिला म्हणून काम करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. २००हून अधिक कार्टून पात्रांसाठी डबिंग करणा-या, तसेच लक्स, सनसिल्क, ब्रु कॉफी अशा जाहिरातींना आवाज देणा-या प्राची सावे-साथी यांनी डबिंगच्या दुनियेतील अनुभव सांगितले. अशा प्रकारे हृद्य सत्कार पहिल्यांदाच होत असल्याने त्या भारावून गेल्या होत्या. ‘अनेक वर्ष कार्टून पात्रांना आवाज दिल्याने मी मोठी होत गेले तरी लहानच राहिले. घर सांभाळून डबिंग करणे हे मोठे आव्हान होते,’ असे सांगतानाच महिलांनी किमान अर्धा तास तरी स्वत:साठी आवर्जून काढावा, असा सल्ला त्यांनी दिला. वयाच्या तिस-या वर्षापासून वाद्य वाजवण्याची आवड जोपासणा-या प्रतीक्षा चिंदरकर या वेगवेगळ्या प्रकारची २५ वाद्ये वाजवतात. आपण या कलेकडे कसे वळलो, हे सांगताना त्या म्हणाल्या, ‘लहानपणापासून मला वाद्य वाजवण्याची आवड होती. घरातला खाऊचा डबा हे माझे पहिले वाद्य होते. माझी ही आवड माझ्या आई-वडिलांनी हेरली. त्यानंतर मी एकेक करत अनेक वाद्ये शिकत गेले.’ आपला हा वादनकलेचा प्रवास उलगडताना त्यांनी तबला, पखवाज, ढोलकी, दिमडी, संबळ, गिटार, ढोलक अशी वाद्ये वाजवून या कार्यक्रमाला सुरेल किनार लावली. ‘प्रहार’च्या तृप्ती राणे आणि प्रियंका चव्हाण यांनीही प्रतीक्षाला सूरमय साथ केली.

आपल्या आई-वडिलांकरिता त्यांनी गिटार वाजवत ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘क्या इतना बुरा हूँ मै माँ’ हे गाणे स्वत: गायले, तेव्हा सगळे हेलावून गेले. यावेळी प्रतीक्षा चिंदरकर यांनी ‘तालब्रह्म’ या आपल्या एक तासाच्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा केली. कोकणच्या भूमीतील चिंदर गावाची सुकन्या असलेल्या प्रतीक्षा यांचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी विशेष कौतुक केले.

सौ. निलमताईंच्या हस्ते यावेळी मीनल बाघेल, प्राची सावे-साथी आणि प्रतीक्षा चिंदरकर या तिघींना, जिजाई संस्थेशी संलग्न महिला बचत गटांची गृहोपयोगी उत्पादने भेट म्हणून देण्यात आली.

तृप्ती राणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रेश्मा भुजबळ यांनी ‘महिला दिना’निमित्त ‘प्रहार’मध्ये गेली दोन वर्षे झालेल्या विशेष कार्यक्रमांचा आढावा घेतला. विशाखा शिर्के यांनी आभारप्रदर्शन केले. ‘प्रहार’च्या महिला कर्मचा-यांनी महिला दिनानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम अनेक अर्थाने आगळावेगळा ठरला.

Similar questions