Hindi, asked by atharv85, 1 year ago

Stri janma tuji Kahani essay​

Answers

Answered by Darkgirl52
1
❤️❣️❤️❣️नारी, अबला, अर्धांगिनी हे शब्द स्त्रीशी अधिक जुळलेले आहेत. अर्धांगिनी म्हणजेच पतीची सेवा करणारी, मुला-बाळांना सांभाळणारी, घरसंसार चालवणारी. पण आजची नारी आपल्या कठोर परिश्रमाने शिकून उच्चपदावर पोचलेली आहे, परंतु तिला चूल चुकलेली नाही. स्त्रीचे संपूर्ण जीवन पाहायला गेले तर जे स्थान तिने मिळवलेले आहे, त्यासाठी तिला कठीण श्रम व अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आह. सावित्रीबाई फुलेंसारख्या स्त्रीमुळे आज स्त्रियांना शिक्षण मिळून मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. ती खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करू शकणारी शक्ती तिच्यामध्ये निर्माण झाली आहे. 
‼️‼️‼️‼️‼️‼️

स्त्रीचा भूतकाळ पाहिला तर स्त्रियांना अनेक यातना सोसाव्या लागल्या आहेत. समाजातील लोक ज्याप्रकारे स्त्रीला वागणूक देत होते, ते दृश्‍य डोळ्यासमोर ठेवले तर अजूनही असे वाटते, की त्याकाळी मुलगी म्हणून जन्माला येणे म्हणजे तिचे दुर्भाग्य होते. स्त्री जन्म घेतला म्हणून समाजातील सारी बंधने जन्मापासूनच तिला स्वीकारावी लागत. या बाबतीत पुरुषांना मात्र पूर्ण स्वातंत्र्य होते. मुलगी थोडी वयात आल्यावर पुरूषांसमोर उभे राहायचे नाही, बाहेरच सोडा परंतु घरात वावरतानादेखील डोक्‍यावर पदर घेऊन वावरावे लागत असे. 

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
लग्न म्हणजे काय हे माहीत नसतानासुद्धा केवळ वयाच्या सहाव्या, सातव्यावर्षी आई-वडिलांचे कर्तव्य म्हणून मुलीचे लग्न करून द्यायचे. नंतर काही वर्षांनी मातृत्व स्वीकारून घरसंसार, मुलांना सांभाळून घरी राहायचे. तिनं फक्त मुलं, संसार आणि नवरा यांच्यासाठी जगायचे. हेच तीच जीवन होते. या व्यतिरिक्त तिचे स्वतःचे असे वेगळे स्थान नव्हते. दुसऱ्यांसाठी दिवसरात्र राबायचे आणि एक दिवस त्यातच झिजून जायचे. तिच्या जीवनाला, जगण्याला कोणतीच सीमा, कोणतीच मर्यादा नसते. चंदनदेखील स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देते. परंतु त्याच्या रक्षणासाठी हजारो नागांचा फणा असतो. 
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

आज परिस्थिती थोडी बदललेली असली, तरीसुद्धा समाजात स्त्रीने एकटे राहणे धोक्‍याचे बनलेले आहे. आई-वडील नसल्यामुळे पोरकी बनलेली मुलगी किंवा पतीचे निधन झाल्यामुळे विधवा बनलेली स्त्री दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. दोघांनाही कोणाचा तरी आधार हवा असतो. आधाराशिवाय समाजात वावरणे म्हणजे “सिंहापुढे शेळीने उभे राहणे’ असते. शेळीला पाहताच सिंह तिच्यावर झडप घेण्यासाठी सज्ज असतो आणि शेळीला त्याच्या तावडीतून सुटणे अशक्‍य होते. “शेळी’ आणि “स्त्री’ यांच्यात कोणताच फरक नाही. घरातून एकदा बाहेर पडल्यावर समाजातील वखवखलेल्या नजरा तिचे लचके तोडण्यासाठी तयार असतात आणि तिला या सगळ्यांच्या नजरा चुकवीत या जगात वावरावे लागते. पुरुष कितीही शिक्षित असो. चारचौघात वावरताना तो उच्च दर्जाचे शब्द वापरेल, परंतु हीच स्त्री जेव्हा त्याच्या पुढे जाईल, उच्चपदावर पोचेल तेव्हा तो तिचा तिरस्कार करू लागतो. त्याचा स्वाभिमान जागा होतो. 

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
आज समाजातील परिस्थिती बदललेली आहे, परंतु स्त्री भ्रूणहत्या कमी झालेली नाही. आजही सुशिक्षित लोकांना मुलगी म्हणजे डोक्‍यावरचे ओझे वाटते. थोडक्‍यात काय परिस्थिती तीच आहे, पण काळ बदललेला आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्त्री जन्मासमोरची ही समस्यांची कहाणी संपणार तरी कधी?
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Hope it helps ✌️ ✌️
⚫️ ⚫️⚫️
Dark
Similar questions