India Languages, asked by helpmeplspls, 1 month ago

/./././././././././././././././././.sub is Marathi/./././././././././././././././././././.

Attachments:

Answers

Answered by sunandatalgaonkar28
7

मी क्रीदागण बोलत आहे.

मी एक शाळेचे क्रीडांगण आहे. माझ्या एका बाजूला एक भव्य इमारत उभी आहे. ती अतिशय आकर्षक स्वच्छ व सुंदर आहे. ती माझी शाळा आहे. माझ्या दुसऱ्या बाजूला एक लहानसा विविध रंगांच्या फुलांनी सजलेला बगिचा आहे. मागे झाडे आहे आणि समोर माझ्याकडे येण्याकरिता छानसा रस्ता आहे.

शाळेतील माझी मुले माझ्या अंगाखांद्यावर खेळतात. ते माझी खूप निगा राखतात. ही मुले आणि रखवालदार माझी झाडपूस करून मला स्वच्छ ठेवतात. माझ्यावर पाणी शिंपडतात. माझ्या अंगावर एकही कागदाचा चिटोरा दिसणार नाही किंवा खडाही दिसणार नाही. याची काळजी घेतात. माझ्या अंगावर उंच-सखल भाग कुठेच नाही. माझ्यावर रोलर फिरवून माझा सपाटपणा व्यवस्थित ठेवला जातो. माझी मुले माझ्याजवळ,विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळतात.

कुणी क्रिकेट, कुणी फूटबॉल, कुणी हॉकी, कुणी बास्केटबॉल असे कितीतरी खेळ खेळले जातात. कुणी कबड्डी आणि कुणी खो- खो खेळतात. मुलांप्रमाणेच मुलीही खेळतात पण खेळणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असते. एन.सी.सी. ची परेड होते तेव्हा माझा रुबाब पाहावा. मुलांचे काय आणि मुलींचे काय गणवेश फारच उठून दिसतात.. त्यातच त्यांचे शिस्तबद्ध आणि लयबद्ध संचलन पाहन तर डोळ्यांचे पारणे फिटते.

मुले माझी एवढी निगा राखतात की कितीतरी राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा भरविण्याचा मान मला मिळतो. राज्यातील अनेक प्रदेशातून खेळाडू मुले व मुली या स्पर्धांसाठी येत असतात. काहींना सुवर्ण, काहींना रौप्य तर काहींना कास्य पदक मिळते. हा सोहळा अपूर्व असतो. जेव्हा माझ्या शाळेतील खेळाडूंना पदक मिळते तेव्हा माझा उर अभिमानाने भरून येतो कारण या खेळाडूनी माझ्याच अंगाखांदयावर खेळाचा सराव करून कौशल्य प्राप्त केलेले असते. रात्रीच्या शांत वेळी मी चिंतन करतो. मला जाणवते की माझ्या या मुलामधूनच ऑलिम्पिकस्मध्ये पदक मिळवणारे खेळाडू निर्माण होणार आहेत.

परंतु आजच्या पिढीतले मुलं मला विसरले आहेत त्यांना हे माहितीच नाही कि माझ्यावर कोणते खेळ खेळले जातात. पूर्वीच्या काळचे मुलं माझ्या अंगावर खेळायचे त्याने त्यांचा व्यायाम व्हायचा आणि ते सगळे निरोगी राहायचे परंतु आजच्या काळचे मुलं हे घरातच खेळ खेळतात आणि ते पण आपल्या मोबाईल फोन वर ते असे खेळ खेळतात ज्याने त्यांच्या शरीराची हालचाल तर होतच नाही परंतु अनेक रोगांना त्यांना जरूर समोर जावं लागत. माझ्या अंगावर येऊन क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी हे खेळ खेळणं कुठेतरी नाहीस होत चाललं आहे. मी क्रीडांगण बोलतोय आणि माझी सर्व मुलांना अशी विनंती आहे कि त्यांनी येऊन माझ्या अंगावर खेळावं जेणे करून त्यांचं शरीर हे निरोगी राहील आणि मला खात्री आहे कि मुलं माझं नक्की ऐकतील.

I hope it helps you..

U can find the other two topics on Goo.gle.(◕ᴗ◕✿)

Similar questions