World Languages, asked by ankur6053, 1 year ago

sun's impotance marathi essay​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

पृथ्वीवर सूर्य इतका महत्वाचा का आहे 3 पृष्ठे 727 शब्द

            पृष्ठभागाचे तापमान: 5200 मी Ê

            फिरण्याची वेळः 25 ता (ध्रुव) 34 ता (विषुववृत्त)

            सूर्य आपल्या ग्रहावर प्रकाश आणि उबदारपणा निर्माण करतो, त्याशिवाय पृथ्वीवरील जीवन केवळ मनुष्यांसाठीच नव्हे तर सूक्ष्मजीवांसाठी देखील अशक्य आहे.

            सूर्य पृथ्वीवर होणार्‍या प्रक्रियेचे मुख्य (केवळ एक नसले तरी) इंजिन आहे. परंतु केवळ त्याच्या उबदार आणि प्रकाशामुळेच पृथ्वीला प्राप्त होत नाही. विविध प्रकारचे सूर्यप्रकाश आणि कणांचे प्रवाह त्याच्या जीवनावर सतत प्रभाव पाडतात.

            पृथ्वीवरील ऑक्सिजन प्रकाश संश्लेषण नावाच्या प्रक्रियेत वनस्पती तयार करतात.

            प्रकाशसंश्लेषण ही सर्वोच्च वनस्पती, समुद्री शैवाल, प्रकाशसंश्लेषण ही एक निर्मिती आहे

            क्लोरोफिल इ. प्रकाशसंश्लेषक रंगद्रव्यांद्वारे शोषलेल्या प्रकाशाच्या उर्जामुळे सोप्या (सीओ 2, एच 2 ओ) पासूनच्या जटिल पदार्थांचे बॅक्टेरिया. एक प्रमुख जैविक प्रक्रिया, ती आपल्या ग्रहावर निरंतर आणि प्रचंड प्रमाणात तयार केली जाते.

            व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी मानवाच्या जीवनासाठी देखील सूर्य आवश्यक आहे.

            काही उर्जा सूर्यप्रकाशाच्या उर्जामुळे तयार होते.

            पृथ्वीचे हवामान सूर्याच्या उर्जेद्वारे नियंत्रित होते. "ग्रीनहाऊस" प्रभावामुळे सूर्याची उष्णता ठेवता येते.

            परंतु केवळ पृथ्वीवरील सूर्यावर सकारात्मक प्रभाव पडत नाही.

            अल्ट्राव्हायोलेट किरणे मोठ्या प्रमाणात हानिकारक असू शकतात आणि सनबर्न आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकते.

            चमक - सूर्यावरील सर्वात शक्तिशाली स्फोटक प्रक्रिया अधिक अचूक आहेत

            त्याचे गुणसूत्र. ते सर्व काही मिनिटे पुढे जाऊ शकतात, परंतु या वेळी कधीकधी 1025 जौल्सपर्यंत पोहोचणारी ऊर्जा वाटप केली जाते. संपूर्ण वर्षभर आपल्या ग्रहाच्या सर्व पृष्ठभागावर सूर्यापासून समान प्रमाणात उष्णता येते.

            कठोर एक्स-रे किरणोत्सर्गाचे प्रवाह आणि चमकती झुडूपांवर जन्मलेल्या सौर स्पेस बीम, पृथ्वीच्या वरच्या वातावरणावरील भौतिक प्रक्रियेवर तीव्र प्रभाव आणि प्रदीर्घ अंतर देतात.

Answered by varadad25
27

Answer :-

मी सूर्य बोलतोय....

भर दुपारी डोक्याला गमचा किंवा टोपी घालून परीक्षेला जाणारी पोरं मी नेहमीच पाहतो. कुणी रस्त्यातच कुल्फी खातं तर कुणी बर्फ गोळा चोखत बसतं. पण माझ्या या तीव्र उन्हाने प्रत्येकालाच त्रास होतो. त्याबद्दल मी आताच दिलगीर व्यक्त करतो. अहो, काय झालं? मी तर आग ओकणारा गोळा सूर्य बोलत आहे.

मी काय करतो? मी फक्त आग ओकून तुम्हांला त्रासच देतो असं नाही तर मी बरीच तुमच्या भल्याची कामे पण करतो. मी सर्व झाडांना त्यांच्या अन्ननिर्मिती साठी माझा प्रकाश देतो. तसंच थंडीत कुडकुडणाऱ्यांना ऊब देतो. मी बऱ्याच कारखान्यांचं वीजबिल ही वाचवतो. म्हणजे मी सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतो. आजून किती काम सांगू मी माझं!

माझं तुमच्या सगळ्यांच्या जीवनात खूप महत्त्व आहे. मी तुमच्यासाठी खूप काही करतो. अगदी ऊब देण्यापासून ते ऊर्जा निर्माण करे पर्यंत! मला हे काम करावंच लागतं. कारण माहितेय? फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठीच मी दररोज न चुकता लाखो अंतर पार करून उगवतो आणि पुन्हा मावळतो! आजून काय करू मी!

कधी कधी वाटतं की जर मी नसतो तर काय झालं असतं या पृथ्वीचं. सगळीकडे अंधार पसरला असता. सारं जग बुडालं असतं. कोणालाच विजेचा शोध लागेपर्यंत काहीच दिसलं नसतं. अहो, मला सांगितलंय माझ्या लहान भावानं, तुमच्या चांदो मामानं! नाईट शिफ्ट असणाऱ्यांची जरा लाईट गेली, की कशी तारांबळ उडते ते. मी माझं कौतुक करत नाहीये. पण तुम्हांला सावधानतेचा इशारा नक्कीच देतोय!

मी एवढं सगळं करतो तुमच्यासाठी. खरं तर खूप थकून जातो मी! पण मला आनंद आहे, की मी तुमच्या उपयोगी येतो. पण तरीही उराशी एक दु : ख बाळगून असतो मी. दु : ख याचंच की माणूस एवढा स्वार्थी आहे, की तो त्याच्यासाठी आवश्यक गोष्टीलाही संपवायला मागे - पुढे पाहत नाही. किती कत्तल करता तुम्ही झाडांची! तुम्हांला धक्का बसला असेल हे ऐकून ; पण आमची देखील एक साखळीच आहे. त्यातला एक जरी तुकडा बाजूला झाला तर अख्खी साखळीच तुटून पडू शकते.

असो! खूप वेळ झाला तुमच्याशी बोलून. मी तुमच्यावर दु : खी नक्कीच आहे ; पण मी माझं काम मात्र सोडणार नाही. पुन्हा कधीतरी बोलू जर तुम्ही मला जिवंत ठेवलं तर! तोपर्यंत राम - राम!

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions