India Languages, asked by narpat4212, 1 year ago

Suryache aatmakatha liha 80 te 100 shabdant

Answers

Answered by prateek2005
3

समुद्र म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले सगळ्यात मोठे दान आहे. त्याची जोपासना आपण करायलाच हवी. समुद्रामुळे कित्येक गोष्टींचा लाभ आपल्याला होतो. पण जर उद्या समुद्रच नसेल तर? तर खरंच आपण जगू शकतो? समजा समुद्र बोलू लागला तर? समुद्राचे आत्मवृत्त, समुद्राचे मनोगत हे आम्ही ह्या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलांना शाळेमध्ये बरयाचदा समुद्र बोलू लागला तर?, समुद्राचे आत्मवृत्त, समुद्राचे मनोगत या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही समुद्राचे आत्मवृत्त या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला समुद्राचे आत्मवृत्त ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

समुद्राचे आत्मवृत्त, मनोगत, समुद्र बोलू लागला तर?  मराठी निबंध, भाषण, लेख

यंदा शाळेला सुट्टी लागली कि समुद्रकिनारी फिरायला जायचंच हे मी आई-बाबांना आधीच सांगून ठेवले होते. मला समुद्राचे फार आकर्षण. समुद्रात उंचच उंच येणाऱ्या लाटा, वाहणारा गार वारा, समुद्रकिनारी असलेली वाळू, त्यात बनवलेले किल्ले सर्वच गोष्टी मला फार प्रिय. तर मग अशाप्रकारे मी ठरवल्याप्रमाणे आई बाबा मला कोकणात घेऊन गेले.

भारताला लाभलेली प्रचंड मोठी समुद्रकिनारपट्टी हे म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेलं मोठं दान आहे. आणि कोकणभूमी ला तर स्वर्गाची उपमा दिलेली आहे. त्यात काही चुकीचेही नाही म्हणा. कोकणातला निसर्ग आणि कोकणी माणूस या दोन्ही गोष्टींनी इथे फिरायला येणारा प्रत्येक पर्यटक अगदी भारावून जातो.

ठरल्याप्रमाणे आम्ही तारकर्लीला पोहोचलो. राहायची जागा बाबानी आधीच बुक करून ठेवलेली होती. तिकडे जाऊन आम्ही आमच्या बॅग ठेवल्या आणि धावतच मी समुद्रावर जाऊन पोहोचले. माझ्या पाठोपाठ आई-बाबाही आले. थोडावेळ तिकडे खेळल्यावर बाबानी परत जाऊयात, उद्या सकाळी येऊ म्हणून फर्मान काढले. संध्याकाळची वेळ असल्याने आणि प्रवासाचा शीण असल्यामुळे आईने सुद्धा उद्या येऊ चा तगादा लावला.

मग काय हिरमुसल्या मनाने आम्ही परत गेलो. रात्री झोपताना मात्र मी मनाशी पक्क ठरवलेलं कि सकाळी आई बाबा उठायच्या आधीच समुद्रावर पळायचं. मला ना समुद्राला मनसोक्त भेटायचं होतं. त्याच्याशी भरभरून गप्पा मारायच्या होत्या.

पहाटेची चाहूल लागताच मला जाग आली. आई-बाबा अजूनही गाढ झोपेत होते. मी माझं आवरलं आणि निघाले. नुकतेच उजाडले असल्याकारणाने समुद्रकिनारा रिकामाच होता. काही मच्छिमार सोडले तर किनाऱ्यावर बाकी कोणीही नव्हते. मी वाळूत बसून किल्ले बनवत असताना समुद्राच्या लाटा माझ्या पायापाशी येऊन परत मागे फिरत होत्या. जणू काही त्या मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत.

मी त्यांना त्यांच्या विश्वातलीच एक वाटायचं कारण म्हणजे माझं समुद्रावर असलेलं नितांत प्रेम असच मला वाटलं. नीट लक्ष दिल्यावर समजलं कि त्या लाटा खरंच मला खुणावत होत्या.. दूर किनारी सूर्य उगवतो त्या दिशेला कोणीतरी मला हात दाखवत होतं. त्याला माझ्याशी बोलायचं होतं..

हो अगदी बरोबर. तो समुद्र होता. माझा लाडका समुद्र. त्याला कसं समजलं असेल कि मलाही त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या? मैत्रीचं नातं तर होतच आमच्यात पण आज मला त्याची घट्ट मैत्रीण व्हायचं होतं. आणि त्यानेही माझ्या मनातलं बरोबर हेरलं. म्हणाला,’ तुझ्यासारखे कित्येक जण माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. तुमचं हे प्रेम बघितलं ना कि फार बरं वाटतं गं.

Attachments:
Answered by AadilAhluwalia
5

सूर्याची आत्मकथा

मी सूर्य बोलतोय!

काय मग, गर्मी आहे ना खूप या वर्षी?

तुम्हाला करोडो वर्ष ऊर्जा पोहोचवताना स्वतःचा विचार नाही केला कधी. निसर्गाची कृपादृष्टी म्हणून तुम्हाला ऊब दिली, तुमचं पोषण केला. झाडांना खाद्य बनवण्यासाठी किरणे पाठवली. तुम्ही दिवस माझामुळेच अनुभवू शकता. उजेड मीच पुरवतो तुम्हाला.

तरीही मनुष्य कृतघ्न वागत आहे. निसर्गाची नासाडी चालली आहे. प्रदूषण वाढत चाललं आहे. म्हणून मला राग आला आहे. दर वर्षी मी उन्हाळयात तापमान वाढवणार. याला माझा राग समाझा आणि तुमची चुकी आटोक्यात आणण्याचा प्रेयत्न करा.

Similar questions