India Languages, asked by mathmatics5457, 11 months ago

svatantra veer savarkar essay 15 to 10 lines in marathi

Answers

Answered by sonagpatil29
0

Answer:

*चरित्रात्मक निबंधस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*

१८५७ च्या स्वातंत्र्य स्मरा नंतर सशस्त्र क्रांतीचा ईतिहास वीर सावरकरांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली पूर्णाहुती, त्यासाठी ज्यां यातना, हाल-अपेष्टा सहन केल्या त्याचा ईतिहास जर साक्षी नसता तर पुढील क्रांती घडणे अशक्य होते.

सावरकरांचे मुळ घराणे कोकणचे, परशुराम भूमीतील गुहागर विभागातले. छत्रपती शिवराय,आणि बाजीरावांच्या काळात त्यातील काही घराणी देशावर आली.त्यातीलच सावरकर कुटुंब नाशिक जवळील भगूर येथे स्थिर झाले. येथेच २८ मे १८८३ रोजी दामोध्ररपंत सावरकरांच्या पत्नी सौ.राधाबाई यांनी चौथ्या मुलाला जन्म दिला.त्यांचे तेजस्वी नेत्र,विशाल भाळ, आकर्षक मुद्रा पाहून नाव ठेवले विनायक, म्हणजे विशेष नायक ! पण याच विनायका ला लहानपणात मातृ सुखाला पारखे व्हावे लागले.

लहानाचे मोठे होत असताना त्यांना लेखन व वक्तृत्व या गुणांचा छंद जडला.एकदा एका वक्तृत्व स्पर्धेची बातमी त्यांना उशिरा समजली. तरीही त्यांनी त्या स्पर्घेत भाग घेतला पण भाषण करणार्यांच्या यादीत त्यांचे नाव शेवटी आले.सर्व स्पर्धकांची भाषणे ऐकताना परीक्षक कंटाळले होत. अश्या वेळी सावरकर भाषणा साठी उभे झाले.त्यांच्या बाणेदार विचारांनी, ओघवत्या भाषेनी परिक्षकांचा कंटाला कुठल्या कुठे गेला.त्या स्पर्धेत सावरकरांना पहिला क्रमांक मिळाला.

बक्षीस वितरण कार्यक्रमात एक परीक्षक बोलताना म्हणाले, “सावरकर आता जे काही बोलला ते काही त्याचे विचार नसावेत. त्याच्या वयाला झेपणारे हे विचार नाहीत. त्याने दुसर्या कुणाकडून तरी हे भाषण लिहून घेतले असणार, पण ते काहीही असले तरी तो बोलला उत्कृष्ट. म्हणूनच आम्ही त्याला पहिला क्रमाक दिला. “मात्र त्याच वेळी सावरकरांनी परीक्षकांना ठणकाउन सांगितले. “हे भाषण माझे आहे मी कोनाकडुनहि लिहून घेतलेले नाही. मला सवय आहे ती स्व:त चे विचार मांडण्याची मी दुसर्या कोणा कडूनही विचार उसने घेत नाही. “परीक्षक पाठ थोपटत म्हणाले” सावरकर नाव यथार्थ कर बरे का! ज्याचा कर पडत्या राष्ट्राला सावरतो. तोच खरा ‘सावरकर’ …. नंतर सावरकरांनी आपल्या नावाची यथार्थता आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केली. आपल्या वयाची पंधरा वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सावरकरांनी भरपूर वाचन केले. मराठ्यांचा ईतिहास, बखरी वाचल्या.महा भारत वाचल्यावर अर्जुनापेक्षा भीम हाच खरा श्रेष्ठ आदर्श पुरुष असल्याचे मत त्यांनी मांडले

सावरकर हे मुळातच राष्ट्रीय वृत्तीचे, उत्तुंग प्रतिभेचे कवी होते. स्वातंत्र्यसमर, जोसेफमोझिनी, माझी जन्मठेप, सहा पाने सोनेरी, सन्यस्त खड्ग , काळेपाणी, गोमंतक, कमला, सप्तर्षी, जातिभेद, हिंदुराष्ट्र दर्शन, हिन्दुपद्पातशाही, हिंदुत्व, क्रांतीघोष, पृष्ठभूमी, ई. विविध वाड्मयातील पुस्तके त्यांनी समरसून लिहिली. एका बाजूला स्वातंत्र्यवीर तर दुसर्या बाजूला स्वातंत्र्यशाहीर अश्या सगळ्या रसायनांमुळे त्यांची कविता म्हणजे स्वातंत्र्य देवतेची आरतीच झाली. ते महान कवी म्हणावे लागेल.त्यांच्या या ओजस्वी साहित्याचा सन्मान करायचा म्हणून १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले होते. सशस्त्र राज्यक्रांतीचे भारतीय धुरंधरत्व करण्याचे महत्कार्य प्रथम महाराष्ट्रात व नंतर इंग्लंड मध्ये त्यांच्या कडेच आले होते त्यामुळे पक्षातील सहस्त्रावधी हुतात्मे, विरात्मे. आणि क्रांती कार्यरत त्यांच्या परिचयाचे होत गेले. त्यांनी ”अभिनव भारत” संस्थेतल्या अगदी भगूर नाशिक पासूनच्या तर पुढे पुढे अनेक परकीय देशांतूनही पसरलेल्या शाखानतल्या लहानमोठ्या सहस्त्रावधी सभासदांना व्यक्तिश:च क्रांती दीक्षेची शपथ देत गेले. त्यांनी ब्रिटीश साम्राज्य सत्तेच्या ग्रासातून सुटन्या साठी विशेष: ते दुसर्या जागतिक महायुद्धाच्या सन १९४६ मध्ये झालेल्या अंता पर्यंत निशस्त्र आणि सशस्त्र मार्गांनी ब्रीटीशांशी जो हा निकराचा लढा कित्येक वर्षे सारखा दिला. त्यात शेवटी हिंदू राष्ट्राला राजकीय आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवून देण्याची सुवर्णसंधी त्याना लाभली.

ते शिक्षणासाठी पुढे इंग्लंडला गेले.तेथे शिक्षण चालू असतानाही देश कार्यात खंड पडू दिला नाही वयाच्या सोळाव्या वर्षी सक्रीय राजकारणात ते भाग घेऊ लागले. इंग्लंड तेथेच त्यांनी ‘अभिनव भारत’ हि क्रांतीसंघटना चालू केली. गावठी पिस्तुले तयार करून मित्रांकरवी एकवीस पिस्तुले भारतात पाठविली. १८५७च्या सहस्त्र उठावाची माहिती व्हावी म्हणून ” स्वातंत्र्य समर” हा जवळ जवळ ५०० पृष्ठांचा मौलिक ग्रंथ लिहिला त्यात हिंदू राष्ट्राच्या दृष्टीकोनातून क्रांती युद्धाचे समीक्षण संपूर्णपणे केलेले असल्याने याची परिणीती म्हणजे स्वातंत्र्ययुद्ध भडकवण्याचिच होती. त्यामुळे ब्रिटीशांची तपासाची चक्रे गतिमान झाली व त्यातच सावरकरांना अटक झाली. ब्रिटीशांच्या कडक पहार्यातून नेले जात असतानाच मार्सेलिस बंदरात त्यांनी सागरात झेप घेतली. त्यांची हि उडी सामान्य नव्हती.ती या त्रिखंडात गाजली.अश्या अनंतप्रसंगामुळेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

ते कट्टर हिंदुत्ववादी होते.पण स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव त्याच्यात नव्हता.विज्ञान दृष्टीहि त्यांना लाभली होती.२४ डिसेम्बर १९१० रोजी त्यांना जन्म ठेपेची शिक्षा झाली. ६ जानेवारी १९२४ रोजी रत्नागिरी कारागृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.पुढे दोन वेळा स्थानबद्धतेत वाढ होऊन अखेर १९३७ ला हि स्थान बद्धता संपली.त्यांचे कारागृहातील जीवन काथ्या कुटणे,चुन्याची घाणी ओढणे, असे काही प्रसंग तर मन थरारून सोडतात. मात्र भारताचे स्वातंत्र्य पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले.

अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते काळाच्या पडद्या आड गेले. परंतु त्यांच्या साहित्य, ग्रंथ लेख या रूपाने ईतिहास कायम आहे, त्यांची स्मृती आजही अजरामर आहे. सागरा प्राण तळमळला ” "जय हिंद-जय भारत"

Similar questions