swach bharat abhiyan essay in marathi
Answers
Answer:
महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल” असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करताना म्हटले. स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप देण्यात आले.स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन दिल्लीतील मंदीर मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. रस्त्यावर लोकांनी घाण करु नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेला पंतप्रधानांनी “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला. याप्रसंगी पंतप्रधानांनी नऊ व्यक्तींना स्वच्छता मोहिमेचे दूत म्हणून घोषीत केले तसेच या व्यक्तींना आणखी नऊ व्यक्तींना स्वच्छतेचे दूत बनवण्यास सांगितले.जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. लोकांच्या सक्रीय सहभागामुळे महात्मा गांधींचे स्वच्छ भारत हे स्वप्न लवकरच आकार घेण्याच्या मार्गावर आहेपंतप्रधानांनी स्वत:च्या उक्ती व कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी वाराणसीमध्येही स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांनी गंगा नदीच्या अस्सी घाटावर अभियानाची सुरुवात केली. स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी स्वच्छतेची महती विशद करत देशातील अनेक कुटुंबांमध्ये शौचालये नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी प्रबोधन केले.
स्वच्छतेसाठीच्या या जनचळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता. सरकारी कर्मचारी, लष्करी जवान, सिने कलाकार, खेळाडू, उद्योजक, अध्यात्मिक गुरू सर्वजण या कार्यासाठी पुढे सरसावले. स्वच्छता अभियासानासाठी देशभरात विभिन्न सरकारी विभाग, अशासकीय संस्था व स्थानिक समाज केंद्रांनी आयोजित केलेल्या उपक्रमात लाखो लोकांनी सहभाग घेतला. संगीत, नाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून देशभरात स्वच्छेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सहभाग, विविध विभाग, संघटनांनी राबवलेले उपक्रम याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी समाज माध्यमातून (सोशल मिडियाच्या) माध्यमातून लोक सहभागाबद्दल नेहमीच प्रशंसा करत आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून ‘#MyCleanIndia’ हा उपक्रम समाजमाध्यमांवर (सोशल मिडियावर) सुरू करण्यात आला.
लोकांच्या प्रतिसादामुळे स्वच्छ भारत अभियानला जनचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकांनी उत्स्फूर्त सक्रीय सहभाग नोंदवत स्वच्छ व निटनेटक्या भारताची शपथ घेतली.
रस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भागच बनला आहे. लोकांनी ही चळवळ पुढे नेत “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” हया संदेशाच्या प्रसारात मदत केली आहे.
Explanation:
pls mark as brainliest
pls pls