Art, asked by asinghhuha, 1 year ago

Swach bharat samrudh bharat, Marathi essy

Answers

Answered by himani2016
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) हातात झाडू घेऊन साफसफाई करत ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले.मोदींनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर ‘एक कदम, स्वच्छता की ओर’ या घोषवाक्‍यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील, असा आशय व्यक्‍त करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर इंडिया गेटमधून त्यांनी राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला.महात्मा गांधी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते. पण, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्‍तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.
Similar questions