swachate war tumche vichar spasht kara in Marathi
Answers
Explanation:
स्वच्छता आणि सौंदर्य या दोन गोष्टी म्हटलं तर कधीच एकत्रित विचारात घेतल्या जात नाहीत. स्वच्छता हा आरोग्याशी संबंधित विषय असं आपण सवयीच्या विचाराने ठरवलं आहे. परिणामी सौंदर्य याविषयी विचार करताना आपण त्याला त्या विचाराच्या आवाक्यात घेत नाही. पण प्रत्यक्ष जीवनात तसं घडत नाही. साधी रांगोळी काढायची असल्यास आधी जमीन झाडून-पुसून घ्यावी लागते व मग त्या जमिनीवर सुंदर रांगोळी काढली जाते. लग्नादी समारंभात आधी वर-वधूसाठी ‘हळदी’चा कार्यक्रम, ज्यामागे आरोग्याचं तत्त्व नक्कीच आहे तो आधी होतो, मग मेंदी वगैरे.. रोजही आपण स्नानानंतरच स्वत:ला सौंदर्योपचारांनी ‘तयार’ करतो. त्यामुळे आपल्या विचारप्रक्रियेत जरी हे दोन विषय एकत्रित नसले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र ते असतात. आजच्या लेखामागचा हेतूच हा आहे की विचारप्रक्रियेत या दोन विषयांना एकत्र आणणे. याची गरज अशी की आज आपला सर्व भर हा वैयक्तिक स्वच्छतेवर आहे. फार फार तर, त्याचा विस्तार कुटुंबाच्या पातळीवर होतो. पण आपल्या घरापलीकडे जाऊन मोठय़ा पातळीवर होत नाही. परिणामी दरवर्षी आपण या दोन्ही विषयांबाबत अनेक विरोधाभास जगत असतो.
Answer:
answer is given above☝☝