SWACHHATA MAZI JABABDARI SPEECH IN MARATHI 15 LINES PLZ GIVE MARATHI BHASHA DIN SATHI PAHIJE
]
DONT GIVE UNUSE ANSWERS GIVE PERFECT ANSWER I WILL DELETE UR ACCOUNT
Answers
Answer:
source internet
Explanation:
आपले अस्तित्त्व हे इतर प्राण्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. इतर प्राणी नैसर्गिकरित्या सुरक्षित असतात. त्यांना अती स्वच्छतेची गरज भासत नाही. परंतु माणूस हा स्वच्छतेने बांधला गेला आहे. काही दिवस अंघोळ जरी केली नाही तरी शरीराचा दुर्गंध येऊ लागतो. घरातील साफसफाई केली नाही तर रोगराई, आजार, अस्वच्छता आसपास पसरते. त्यासाठी शरीर आणि परिसर स्वच्छ राखणे महत्त्वाचे आहे.
आज समाजात स्वच्छता नसल्याने गंभीर परिस्थिती उत्पन्न झाली आहे. कचरा व्यवस्थापन ही बाब सातत्याने समोर येऊ लागली आहे. सरकार आणि सामाजिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतेच! पण अत्यंत प्राथमिक स्तरावर म्हणजे व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत सजग असणे गरजेचे आहे. स्वच्छता आपण कशी राखू शकतो किंवा काय तरतुदी करता येतील याचे विश्लेषण आपण करू शकतो.
प्रथमतः आपण कुटुंबापासून सुरुवात करू शकतो. प्रत्येकाच्या घरी कचरा साठत असतो. त्यानुसार कचरानिर्मूलन कशा पद्धतीने होत आहे ते पाहूया. ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापन हे दोन वेगवेगळे घटक आहेत. सुका कचरा आपल्याला जाळता येऊ शकतो आणि ओला कचरा आपण जैविक खतासाठी वापरू शकतो. खतनिर्मिती आणि रासायनिक पदार्थांचा निचरा हा योग्यरीतीने करता येऊ शकतो.
घरात कचरा असेल तर स्वतः झाडू घेऊन तो स्वच्छ केला पाहिजे. प्लास्टिक कचऱ्याचे लवकर विघटन होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर टाळणेच चांगले! सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वतःहून घाण न करणे, परिसरात कचऱ्याची कुंडी ठेवणे आणि त्यातच कचरा टाकणे, असे काही मुख्य हेतू ठेऊन तुम्ही त्याची अंमलबजावणी सामाजिक स्तरावर देखील करू शकता. त्यामुळे एका स्वच्छ समाजाची, गावाची, आणि शहराची निर्मिती होऊ शकते.
परिसरातील स्वच्छता म्हणजे सर्व पर्यावरणातील घटकांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. नदी, नाले, डोंगर, जमीन, हवा प्रदूषित होऊ न देणे हे देखील स्वच्छतेचेच काम आहे. लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यातच वाढत चाललेल्या जगण्याच्या स्पर्धेमुळे खूप सारी नैतिकमूल्ये लयास गेलेली आहेत. मानवी स्वार्थ वाढत आहे. निसर्गाची दयनीय अवस्था आज आपल्याला त्यामुळे पाहण्यास मिळत आहे. प्रदूषण हटवून आपण निसर्गाची स्वच्छता राखली पाहिजे.
स्वच्छता नसल्याने काय काय नुकसान होऊ शकते हे आपणास समजले पाहिजे. सर्वप्रथम असे संसर्गजन्य आजार पसरतात ज्यामुळे समाज रोगी बनत जातो. त्याचे परिणाम सर्वांच्या शरीरावर, प्राण्यांवर आणि वातावरणावर होत असतात. एक पिढी जर स्वच्छतेबाबत जागरूक नसेल तर पुढची पिढीही तशीच बनते. साफसफाई न करता गबाळे
राहणे हे शारीरिक स्तरावर देखील होऊ लागते. त्याचा परिणाम म्हणून मनही मळकट होत जाते.
स्वच्छतेचे फायदे हे अगणित आहेत. स्वच्छता सर्व शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर ठेवली गेली तर प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते. परिसरात स्वच्छ आणि ताजी हवा वाहू लागते. व्यवस्थितपणा आणि टापटीपपणा हा सर्व जीवनात अंगिकारला जातो. लोक ती स्वच्छता बघून आकर्षिले जातात मग असा समाज, देश प्रगतीच्या वाटेवर जाऊ लागतो.
शुद्ध स्वरूप आणि निखळ आनंद यांची प्राप्ती आणि जाणीव होण्यासाठी शरीर, मन, घर, परिसर, अशा सर्व स्तरांवर स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या नैसर्गिक घटकांची आवश्यकता आहे जसे की हवा, पाणी, जमीन इत्यादी ते घटकदेखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. अशा जाणिवेतून आणि मग प्रत्यक्ष घडणाऱ्या कृतीतून आपण एक स्वच्छ, सृजनशील आणि विकसित समाज घडवू शकतो.