Math, asked by Vaibhav5130, 11 months ago

Swapna Sakartana essay in Marathi

Answers

Answered by debdeep120
1

Answer:

माझे स्वप्न आहे, समाजातील जातिभेद, पंथभेद, धर्मभेद नष्ट व्हावे. काही जण, कोणी नवीन माणूस भेटला की, विचारतात 'तुमची जात कोणती? तुमचा धर्म कोणता? काय सांगावं बरं अशांना! मला जर असं कोणी विचारलं तर, मी एकच ठामपणे सांगेन की, माझी जात मानवजात आणि माझा धर्म मानवता धर्म.'

माझे स्वप्न आहे जर मानवामध्ये दया, माणुसकी आली तर मानवाचे जीवन किती सुरळीत चालेल? मी शास्त्रज्ञ झाले तर विविध आजारांवर उपाय, संशोधन करून मानवी जीवन सुखी करेन. जर डॉक्टर झाले तर रुग्णांची अखंड सेवा करेन.

जीवनात मी कोणतीही नोकरी केली तरी मी एकच ध्येय ठेवेन की, 'लोकांमधील धर्मभेद, जातिभेद, पंथभेद कसे जातील आणि त्यांच्यात करुणा, माणुसकी कशी येईल? आतापर्यंत मोठे मोठे नेते आपल्याला चांगला संदेश देत राहिले. एवढेच काय! त्यांनी लोकांसाठी स्वत:चे प्राण देखील अर्पण केले.

Similar questions