Hindi, asked by priyanka0903, 5 months ago

swarthi mitra story in marathi​

Answers

Answered by bhumikabehera16
33

Answer:

स्वार्थी मित्र - Sworthi Mitra

एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे.

ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो.

अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो.

थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ' अस्वलाने तुला काय सांगितले रे '..? त्यावर शाम उत्तर देतो की , "त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली.

तात्पर्य - संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र

Explanation:

HOPE THIS WILL HELPS U MATE

DO FOLLOW AND MARK AS BRAINLIEST..

25❤️ Ïẞ

Answered by ajha46848
9

Answer:

स्वार्थी मित्र

एका गावात दोन मित्र राहत होते. त्यांचे नाव राम आणि शाम होते. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात जाते. जंगलात जात असताना त्यांनी एकमेकांना संकटात एकमेकांचे रक्षण करायचे, असे वचन दिले.

ते जंगलात गेल्यानंतर त्यांच्या समोरून अचानक एक अस्वल धावत येत असताना दिसते. हे पाहताच राम स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो, पण शामला झाडावर चढता येत नव्हतं. शाम घाबरून जातो. त्याला काही सुचत नाही, तो विचार करू लागतो आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यात युक्ती येथे, तो जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो.

अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जाते, जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो.

थोड्यावेळाने अस्वलाला वाटते की, शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जाते. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो,'अस्वलाने तुला काय सांगितले रे...? त्यावर शाम उत्तर देतो की,"त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर रहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत, ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली.

तात्पर्य:- संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र.

Explanation:

hope u understand ☺️

Similar questions