T)कथालेखन.
पुढील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.
शब्द - मैत्री, दप्तर, गृहपाठ, रस्ता.
मंत्री
श्न-५) निबंध लेखन.
Answers
Answered by
2
कथा लेखन
Explanation
खरा मित्र.
- साहिल आणि रमेश नावाचे दोन खूप चांगले मित्र होते. ते रोज शाळेत एकत्र जायचे.
- एकदा शाळेत जात असताना रमेशच्या दप्तरातून कधी त्याच्या गृहपाठाची वही खाली रस्त्यावर पडली, हे त्याला कळलेच नाही. दप्तर खालून फाटले होते, परंतु ते त्याच्या नंतर लक्षात आले.
- शाळेत पोहोचल्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून गृहपाठाच्या वह्या तपासायला मागितल्या. रमेशने दप्तरात त्याची वही फार शोधली परंतु, त्याला ती मिळाली नाही. शिक्षिकेच्या भीतिने त्याला घाम फुटू लागला.
- त्याची भीती पाहून साहिलने त्याच्या गृहपाठाची वही रमेशला दिली, त्यामुळे त्याला शिक्षिकेकडून शिक्षा झाली.
- साहिलला शिक्षा झालेली पाहून रमेशला रडू आले. त्याने शिक्षिकेला सगळी हकीकत सांगितली व त्यांच्याकडून माफी मागितली.
- शिक्षिकेने दोघांना माफ केले. शाळा सुटल्यावर घरी जात असताना, रस्त्यावर साहिलचे लक्ष एका वहीवर गेले. वही खोलून पाहिल्यावर त्याला कळले की ती रमेशची वही आहे. वही मिळाल्यावर ते दोघे खूप खुश झाले.
- तात्पर्य: मैत्रिची खरी परीक्षा संकटाच्या वेळी होते.
Similar questions