T: उताऱ्यातील दोन संगीत नाटके
Answers
Answer:
REFER TO ATTACHMENT
HOPE HELPFUL
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.
सवाई गंधर्व (२००८)
डिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. ’संगीत कुलवधू’ या नाटकाद्वारे मास्टर कृष्णराव यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले.
समीक्षकांनी व अभ्यासकांनी संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे पुढीलप्रमाणे मानले आहेत.
- किर्लोस्कर-देवल काळ - १८८० -१९१०
- खाडिलकर-बालगंधर्व काळ - १९१० - १९३०
- अत्रे-रांगणेकर काळ - १९३० - १९६०
- गोखले-कानेटकर काळ - १९६० - १९८०