Geography, asked by dikshabavne10, 3 months ago

तिबेट च्या पठाराची लोकसंख्या घनता अधिक आहे​

Answers

Answered by shrutikshajadhav
3

Answer:

तिबेट (तिबेटी: བོད་; चिनी: 西藏) हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. त्याला तिबेटचे पठार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देश व चीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे.

बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा ह्यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात. लाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष. चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती, शिक्षण, धर्म, साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंत:करणपूर्वक स्वागत केले.” (डॉ. हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५, भारतीय विचार साधना प्रकाशन पृष्ठ क्रमांक १७५ )

Explanation:

plz mark as brilliant and like this ans plz

Similar questions