तोंडाळ असे भांडू नये वाचाला सी तंडू नये संत संग खंडू नये अंतर्यामी या ओळीचा काव्यपंक्ती चे विचार सौंदर्य स्पष्ट करा
Answers
Answered by
3
Answer:
उत्तमलक्षण ' या श्रीदासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगतिली आहेत . तिने कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा खुलासा केला आहे . भांडखोर व्यक्तीशी भांडायला जाऊ नये . सतत बडबड करणाऱ्या व्यक्तीशी वाद घालत बसू नये , कारण या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती समोरच्याचे बोलणे ऐकून न घेता स्वत : चेच म्हणणे खरे करणाऱ्यांपैकी असतात . त्यांच्याशी बोलणे म्हणजे आपला वेळ , आपली शक्ती वाया घालवल्यासारखे होईल . त्यामुळे , अशांचा संगच टाळावा ; परंतु संतांच्या संगतीत अखंड रमावे . मनापासून त्यांच्या सहवासाचा , सान्निध्याचा लाभ घ्यावा , कारण त्यांच्या संगतीत राहून आपणही सज्जन बनतो , असा संदेश वरील काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करतात .
Similar questions
Computer Science,
1 day ago
Math,
1 day ago
Social Sciences,
1 day ago
Physics,
8 months ago
English,
8 months ago
Math,
8 months ago