India Languages, asked by maskarvishvajit, 9 months ago

तोंडाळासी भांडों नये। वाचाळासी तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामी ।।४।। रसग्रहण करा please urgent ​std 10th

Answers

Answered by sakshighute108
42

Explanation:

उत्तमलक्षण या श्री दासबोधातील उपदेशपर रचनेतुन संत रामदासांनी आदर्श व्यक्तिची लक्षणे सांगितली आहेत. यात कोणात्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाही याचा खुलासा केला आहे. भांडखोर व्यक्तिशी भांडायला जावू नये. सतत बडबड करतात अशा व्यक्तिशी वाद घालत बसू नये कारण या दोन्ही प्रकारच्या व्यक्ति समोरच्याचे बोलाणे येकू न घेता स्वतःचे खरे करत असतात. त्यांच्याशी बोलणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे आहे. त्यामुळे अशांना टाळावे व संतांच्या संगतीत रमावे मनापासून त्यांच्या सहवासाचा लाभ घ्यावा. कारण त्यांच्या संगतीत राहून आपनही सज्जन बनतो. असा संदेश वरील काव्यपंक्तीतुन लेखक व्यक्त करतात.

Answered by rajraaz85
18

Answer:

तोंडळाशी भांडू नये। वाचाळाशी तंडो नये। सतसंग खंडु नये। अंतर्यामी।

वरील ओव्या या संत रामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथातील आहेत.

Explanation:

संत रामदास हे भारतातील अतिशय थोर असे संत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ते एक थोर कवी होते, विचारवंत होते, लेखक होते आणि आध्यात्मिक गरु देखील होते. त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे खूप मोठे कार्य केले. समाजात वावरत असताना माणसाचे कार्य कसे असावे याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या साहित्यातून केले.

तोंडळाशी भांडू नये। वाचाळाशी तंडो नये। सतसंग खंडु नये। अंतर्यामी।

वरील ओव्या या संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथातील आहेत .वरील ओव्यांच्या माध्यमातून संत रामदास समाजात माणसाने कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करतात. संत रामदास म्हणतात समाजात प्रत्येक प्रकारचे व्यक्ती असतात जर कोणी भांडखोर असेल तर त्याच्याशी भांडण करून काही फायदा नाही कारण ती त्याची सवय आहे. एखादा नेहमी बडबड करत असेल तर तो आपले म्हणणे कधीही ऐकून घेणार नाही. अशा व्यक्तीं पासून लांब राहिलेलेच नेहमी चांगले. ते म्हणतात आपले आचरण विकसित करण्यासाठी संतांची साथ नेहमी लाभली पाहिजे. कारण संतांच्या सहवासाने आपल्याला आत्मज्ञानाची जाणीव होते व आपले आचरण शुद्ध होते.

Similar questions