तूफान आलय अनेक गांव पानीदार झाले मराठी निबंध
Answers
Answer:
In Marathi,
मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकुडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळग्रस्त असणारे गाव वळवाच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. सारे गावकरी या घटनेमुळे आनंदित झाले. गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व परदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनीही या घटनेबाबत समाधान व्यक्त केले.
या सर्वांना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते. गावातील सानथोर मंडळी आणि शहरात, परदेशात नोकरीनिमित्त बाहेर गेलेली मंडळी यांनी एकत्र येऊन साताऱ्यातील कुकुडवाडी गावातील दुष्काळावर मात केली आहे.
गेले दोन महिने सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लाखो लीटर पाणी वाचेल एवढे चर खणले. बंधारे बांधले. डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी या बंधाऱ्यांमुळे अडवून धरले जाईल अशी योजना केली. या सर्व मेहनतीचे फळ गावाला मिळाले. भविष्यात जूनपासून येणाऱ्या पावसामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे..
बंधाऱ्यांनी अडवून धरलं. डोळ्या डोळ्यांत पाणी तराळलं. कष्टाचं फळ मिळालं. पाण्याच तुफान आलं. माणसांच्या एकजुटीनं हे साध्य केलं.
कायम दुष्काळग्रस्त असणारं हे गावं पाण्यानं भरल्यामुळे कुकुडवाडी गाव आनंदित झाले आहे. गावकऱ्यांबरोबरच शहरात, परदेशात नोकरी करणाऱ्या अनेक ग्रामस्थांचाही या कार्याला आर्थिक हातभार लागला होता।
Answer:
Hope it helps you
PLEASE MARK ME AS BRAINLIEST ANSWER