तिफन सारखी दुसरी एक कविता मराठी?
Answers
काळ्या मातीत मातीत, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
इज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो
सदाशिव हाकारतो, नंदीबैलाच्या जोडीला
संग पारवती चाले, ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती, माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं, भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते, वाट राघूची पाहते
राघू तिफन हानतो, मैना वाटुली पाहते
काळ्या मातीत मातीत....
सर्जा रं माझ्या, ढवळ्या रं माझ्या, पवळ्या रं माझ्या आ हा
झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती, जनू करती भजन
गव्हा-जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
तशी चांदी लकाकते, कपाशी फुलते
काळ्या मातीत मातीत....
चालं ऊनपावसाचा पाठ शिवनीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो, काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं, हिरवं सपान फुलतं
काळ्या मातीत मातीत....
(जावं सपान भंगून कसं उजाडलं रान
झाडावरची पाखरं गेली इसरुन गानं
सर मिरगाची न्हाई कशी तहानली माती
यावं आभाळ भरुन जावी भिजून धरती
मोती टपुरं घामाचं देहातून ओघळवं
भिजभिजलं अंकुर दिसामासानं वाढावं
दिसामासानं वाढता हिरव्या रंगात डोलावं
काळ्या मातीत मातीत, तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
खोल नांगराचा फाळ माती हृदयी झेलते
ग्वाड हुरड्याचा घास लेकरांच्या मुखी देते
आसं माऊलीचं देणं कष्ट करुन फेडावं
तीर्थ घामाचं देऊन तिचं पूजन करावं
कथा भिजल्या घामाची पिढ्यापिढ्यात चालते
पिढ्यापिढ्यात चालते, अमर ठरते
काळ्या मातीत मातीत, तिफन चालते)
..
...
.... hope you like it