तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास बहिष्कृत भारत या ओळी चा अर्थ काय आहे
Answers
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविला नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि घडविला बहिष्कृत भारत’
या ज.वि. पवारांच्या ओळी सार्थ ठरतात. तत्वज्ञान कोणतेही असो ते परिस्थितीसापेक्ष बदलत जाते. विचारांच्या उच्चतम पातळीवरून नवनवीन तत्वज्ञानाचा उदय होत असतो आणि डॉ. आंबेडकरांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांची सामाजिक चळवळ ही या तत्वज्ञानाची धगधगती मशाल होती. त्याच मशालीने शूद्रातिशूद्रांना अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशात वाटचाल करण्यासाठी नवी दिशा दाखविली वा आत्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा केला.
Answer:
तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत
या सुंदर ओळी कवी जयराम विठ्ठल पवार यांच्या 'तू झालास मूक समाजाचा नायक' या कवितेतील आहेत.
कवितेच्या माध्यमातून कवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगान करतात. कवी म्हणतात की, ज्या वेळेला संपूर्ण समाज आपापसात जाती, धर्म, पंथ, रंग या गोष्टींमुळे विभागला गेला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येकासाठी समानतेचा आवाज उठवला. उच्चवर्णीय लोक स्पृश्य अस्पृश्य असा समाजात भेदभाव करत होते आणि अस्पृश्य समाजाला हीन वागणूक देत होते. होणाऱ्या अन्यायाविरोधात कुणाचीही बोलण्याची हिंमत होत नव्हती, त्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक काढून लोकांवर होणार्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. ते मूक अशा समाजाचे नायक झाले. ज्या समाजाला बोलता येत नाही त्या समाजाला मुक समाज म्हणतात. अशा समाजाचे प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. उच्चवर्णीय लोकांनी समाजातील एका घटकाला बहिष्कृत केले होते आणि बहिष्कृत झाल्यामुळे खालच्या जातीतील लोकांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहावे लागत होते. अशा बहिष्कृत समाजाला स्वतः विरुद्ध होणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या बहिष्कृत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जागे केले व अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले.