India Languages, asked by siddheshbagul572, 9 hours ago

तुझ्या शौर्य गाथेपुढे, त्याची केवढीशी शान "या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by rajraaz85
11

Answer:

           'तुझ्या शौर्यगाथे पुढे, त्याची केवढीशी शान' या ओळी कवियत्री इंदिरा संत यांच्या प्रसिद्ध अश्या 'औक्षण' या कवितेतील आहेत.

           कवियत्री इंदिरा संत या उत्कट अशा भावना व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना लोकांच्या हृदयापर्यंत  पोहचण्याचे काम केले आहे. औक्षण कविता ही देखील त्याचेच एक अप्रतिम उदाहरण आहे. सैनिक जेव्हा सीमेवर स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढण्यासाठी जात असतो तेव्हा समाजातील प्रत्येकाने त्याच्याबद्दल दाखवलेली कृतज्ञता किंवा शुभकार्यासाठी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच औक्षण होय.

Explanation:

          कवियत्री म्हणतात की सैनिक जेव्हा सीमेवर अलौकिक असा पराक्रम दाखवतो, त्या पराक्रमाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. कारण ते देशासाठी केलेले सर्वोच्च कार्य असते. सीमेवरती सैनिकाने केलेले शौर्य आणि पराक्रम  हे वंदनीय असते आणि त्याची वेगळीच अशी शान असते. सैनिकांचे कार्य हे प्रत्येकाला अभिमान वाटावे असेच असते. आणि आपण काहीही केले तरी त्या पराक्रमाची परतफेड होणार नाही असे कवियत्री आपल्या ओळींच्या माध्यमातून सांगतात.

Answered by HarshWa5147X
0

Answer:

answer is given in photo

Explanation:

I hope this photo will helpfull for you

Attachments:
Similar questions