तुका झालासे कळस | भजन करा सावकाश | | या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा
Answers
Explanation:
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला.
प्रश्न 2.
‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे
Answer:
I was also having same doubt