Science, asked by saurabhbh442, 6 months ago

ताकात कोणता उपयुक्त सुक्ष्मजीव आढळतो​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

सूक्ष्मजीव विज्ञान : (मायक्रोबायॉलॉजी). सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसू न शकणाऱ्या तसेच साधी संरचना व कार्य असलेल्या असंख्य प्रकारच्या जीवांच्या मोठ्या गटाला सूक्ष्मजीव म्हणतात. या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानशाखेला सूक्ष्मजीवविज्ञान म्हणतात. सूक्ष्मजीव ओळखणे, त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या रचना व कार्ये यांचा अभ्यास करणे आणि त्यांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम अभ्यासणे या मुख्य गोष्टींचा अंतर्भाव सूक्ष्मजीवविज्ञानात करतात.

नुसत्या डोळ्यांनी दिसू न शकणारी सजीव रूपे अस्तित्वात आहेत, याचा शोध सतराव्या शतकात लागला. तेराव्या शतकानंतर मानवी इतिहासात लागलेला हा महत्त्वपूर्ण शोध होता. कारण तेव्हापासून ऱ्हास (विघटन) व रोग यांना अदृश्य जीव कारणीभूत असतात, असे गृहीत धरले जात होते. मायक्रोब (सूक्ष्मजीव) हा शब्द एकोणिसाव्या शतकात या जीवांचे वर्णन करण्यासाठी तयार करण्यात आला. हे सर्व जीव एकमेकांशी निगडित आहेत असे मानले होते. अखेरीस सूक्ष्मजीवविज्ञानाचा एका विज्ञानशाखेत विकास झाला, तेव्हा सूक्ष्मजीव हा अगदी भिन्न अशा जीवांचा अतिशय मोठा गट असल्याचे दिसून आले. अशा रीतीने सूक्ष्मजीवविज्ञानाची सूक्ष्मजंतुविज्ञान, आदिजीवविज्ञान, विषाणुविज्ञान (व्हायरसविज्ञान) वगैरे उपशाखांत विभागणी करण्यात आली. सूक्ष्मजंतूंची विविधता अफाट आहे. त्यामुळे सूक्ष्मजीवविज्ञानामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व उपशाखांचे ज्ञान एका व्यक्तीला असू शकणे ही जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

सूक्ष्मजीव ओळखणे तसेच त्यांची संरचना व कार्य यांचा अभ्यास करणे या गोष्टी सूक्ष्मजीवविज्ञानात करतात. सूक्ष्मजंतू [→ सूक्ष्मजंतुविज्ञान], ⇨ रिकेट्‌सिया, यीस्ट व बुरशी यांच्यासारखी लहान ⇨ कवके, ⇨ शैवले, आदिजीव [प्रोटोझून → प्रोटोझोआ] तसेच ⇨ व्हायरसा सारखी (विषाणूसारखी) विवादास्पद जीवरूपे यांचा अभ्यास सूक्ष्मजीवविज्ञानात करतात. सूक्ष्मजीवांना प्राणी वा वनस्पती असा दर्जा देणे अवघड असल्याने कधीकधी त्यांचा जीवकण (प्रोटिस्ट) हा स्वतंत्र गट करतात. म्हणजे काही सूक्ष्मजीव वनस्पतींसारखे तर काही प्राण्यांसारखे आहेत. सूक्ष्मजीवांची प्रोकॅरिओट व यूकॅरिओट या दोन गटांतही विभागणी करता येते. यांपैकी प्रोकॅरिओटामध्ये कोशिकेतील (पेशीतील) केंद्रकीय द्रव्य आदिम व विसरित प्रकारचे असते. नील-हरित शैवले, सूक्ष्मजंतू आणि रिकेट्सीई हे या गटातील सूक्ष्मजीव आहेत. यूकॅरिओट गटाच्या सूक्ष्मजीवांत केंद्रक स्पष्ट (सुव्यक्त) आणि पटलाने बद्घ झालेले असते. नील-हरित शैवलांव्यतिरिक्त असलेली लहान शैवले, यीस्ट, बुरशी व आदिजीव यूकॅरिओट गटात येतात (सर्व उच्चतर जीव यूकॅरिओट आहेत). यूकॅरिओट सूक्ष्मजीव एककोशिकीय असून त्यांच्यात गुणसूत्रे असतात व त्यांच्या कोशिकेचे समविभाजन होते.

Answered by ramadeshpande20
2

Answer:

लँक्टोबँसिलस

lactobacillus

I hope this will help you..

Please mark me as brainliest..

Similar questions