India Languages, asked by patilananda882, 7 months ago

तुला आवडणाऱ्या लेखका विषयी माहिती ​

Answers

Answered by tanmayikakade134
3

Answer:

शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [१]. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. [२] ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.

hope it will help you my dear friend

pls pls make me as brainliest

have a great day

Explanation:

Similar questions