टेलेफोन चा इतिहास मराठी
Answers
Answer:
टेलिफोनच्या अस्तित्वाची शक्यता ग्रॅहम बेलच्या त्या वाक्यानं स्पष्ट होते! ते म्हणाले होते, “जर मी वीजेच्या तीव्रतेला आवाजाच्या चढ-उतारानुसार त्याचप्रकारे कमीजास्त करण्याची व्यवस्था करू शकलो, जसे आवाजाच्या वेळेला हवेच्या घनत्वा मधे होते, तर मी मुखातुन बोललेल्या शब्दांना टेलिग्राफ विधी च्या साहाय्याने एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोहाचवण्यात समर्थ होऊ शकेल!’’
ग्राहम बेलने आपल्या या निश्चयाला घेउन आपल्या सहायक थॉमस वॉटसन च्या मदतीने टेलिफोन पध्दती चा आविष्कार करायला प्रारंभ केला, अंततः १० मार्च १८७६ साली त्यांनी असे यंत्र बनवण्यात सफलता मिळवली ज्याव्दारे त्यांनी वॉटसन ला संदेश पाठवला “मीस्टर वॉटसन इकडे ये! मला तुझी आवश्यकता आहे’’.
योगायोगाने त्याच सुमारास अमेरिकेत अन्य काही शास्त्रज्ञ देखील याच कामावर आपले लक्ष केंद्रीत करून होते, ग्रॅहम बेल ने जेव्हा आपले यंत्र पेटंट करण्याकरता विनंती अर्ज केला त्याच्या अवघ्या तीन तासानंतरच एलिशा ग्रे नावाच्या शास्त्रज्ञाने देखील सारख्याच प्रयोगाकरता आपले पेटंट बद्दल चे निवेदन दिले. पुढे यावर मोठा वादविवाद झाला, बऱ्याच न्यायालयिन लढयानंतर ग्रॅहम बेल विजयी झाले आणि टेलिफोन चे जनक ठरले.