तुला दूरदर्शनवरील आवडलेल्या जाहिरातीविषयी पुढील मुद्यांच्या सहाय्याने माहिती लिही. (गुण-२) ) जाहिरातिचा विषय कोणता आहे?.... -)ती जाहिरात तुला आवडण्याचे कारण
Answers
Answer:
दूरदर्शन भारतातील पहिले चॅनल आहे. दूरदर्शन मोफत आहे.ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून दूरदर्शनवर नियमित दैनिक प्रसारणांची सुरुवात १९६५ मध्ये करण्यात आली. १९७५ पर्यंत भारतातील फक्त ७ शहरांमध्ये टीव्ही सेवा होती आणि दूरदर्शन ही भारतातील टीव्ही सेवा देणारी एकमेव कंपनी होती. जी आज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते.
दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक (नेटर्वक) जाळे आहे. डीडी -१ ही वाहिनी १०४२ प्रादेशिक ट्रान्समिटर्स पर्यंत याचे जाळे पसरले आहे. देशात ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१ चे कार्यक्रम पोहेचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समिटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इन्सॅट) वर अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे. देशात ४९ शहरांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती केंद्र कार्यरत आहेत. दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले.आज "प्रसार भारती" या संस्थेच्या अखत्यारीत असलेले दूरदर्शन त्यावेळी ऑल इंडिया रेडिओचाच एक भाग होते. १९७२ साली दूरदर्शनचे मुंबई केंद्र सुरू झाले. पहिली काही वर्ष महाराष्ट्रात मुंबई-पुण्यातच कार्यक्रम दिसत. त्याचा पसारा ख-या अर्थाने वाढला तो १९८२ साली देशात झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमुळे..!! तेव्हा दूरदर्शन खेड्यापाड्यात पोचले. सुरुवातीला या माध्यमाला अनेकांनी विरोध केला. लोकांना टीव्हीची नाही तर भाकरीची गरज आहे, असे म्हणणारे पुष्कळ होते. पण गमंतीची गोष्ट अशी की लोकांनीच हे म्हणणे खोटे पाडले. ज्या खेड्यांत वीज नव्हती तिथे ती आल्यावर अनेकांनी पहिल्यांदा दूरदर्शन संच विकत घेतले.
दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. या बरोबरच राष्ट्रीय प्रसारणास सुरुवात. रंगीत दूरदर्शनचे युगही याचवेळी सुरु झाले.
१९८२ मध्ये दूरदर्शन राष्ट्रीय प्रसारक महणून अस्तित्वात आ[२]ले. पूर्वी खाजगी टीव्ही वाहिन्या नव्हत्या त्यामुळे दूरदर्शन ही एकमेव वहिनी होती. दूरदर्शन वरील कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले. जसेकी रामायण (१९८७) , महाभारत, शक्तिमान, श्रीमान श्रीमती इत्यादी.
Answer:
1) जाहिरातीचा विषय हा साबण आहे
प्रोडक्ट आहे सिबामेड
2) मला ती जाहिरात अवडली कारण त्यात म्हटलेले आहे की Science चे आएका फिल्म स्टार्स च नाही