Math, asked by vishwajeetthombare6, 5 months ago

तुळस या वनस्पतिचा उपयोग लिहा​

Answers

Answered by rahul42291
0

Answer:

या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत,एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात. कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन तुळशीच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो .तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते . तुळशीचे बी पाण्यात २ ते ६ तास पाण्यात भिजवतात. भिजलेल्या बिया दुध-साखरेबरोबर खाल्ल्यास केल्यास उष्णता कमी होते. मधमाशीचा दंश झाल्यास तुळसीतली माती वापरल्यास आराम पडतो. कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची ४-५ पाने धुवून तळहातावर तंबाखूसारखी चोळतात व निघालेला रस दंशाचे जागी लावतात. त्याने आग होणे थांबते. तुळस मोठया प्रमाणात प्राणवायू सोडते .त्यामुळे सकाळी व संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.तुळस ही जवळजवळ सर्वच आजारांवर गुणकारी आहे

Answered by PredictorPrajwal
7

Answer:

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलामध्ये संगुधी तेल असते . फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.

Step-by-step explanation:

I hope this answer is helpful for you...❤❤✨✨✌✌

Attachments:
Similar questions