'तुम्ही अनुभवलेली एक रम्य पहाट' यावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
Answers
Answer:
sry i can't understand hindi
Answer:
पहाटेची वेळ ही सर्वांसाठी आकर्षणाची गोष्ट असते. पहाट हे माणसाला स्फूर्ती देते, उत्साह वाढवते. पहाट आपल्याला अनेक गोष्ट देऊन जाते किंवा जगण्याची उमेद घेऊन येते. काळरात्री नंतर येणारी पहाट आपल्या आयुष्यात नवीन काहीतरी घेऊन येण्याची ग्वाही देते. निळाभोर अशा आकाशात हळूहळू सूर्याचे किरण येण्याच्या अगोदर सुंदर व स्वच्छ आकाश मनाला प्रसन्न करुन जाते.
एकदा मी माझ्या मामाच्या गावाला गेलेलो असताना आम्ही सर्व बाबांनी पहाटेच्यावेळी शेती कडे जाण्यास निघालो. नेहमी लक्षात राहील अशी अस्मरणीय अशी ती पहाट होती. पाऊस पडल्यामुळे संपूर्ण माळराण हिरवेगार दिसत होते. स्वच्छ आकाशात पांढरे शुभ्र ढग एकमेकांचा पाठलाग करत होती. ते पाहून आम्ही सर्वजण निसर्गाचा आनंद लुटत होतो. येणारी पहाट ही आपल्याला काहीतरी नवीन घेऊन येईल असेच वाटत होते. मन हिरवागार निसर्गामुळे व स्वच्छ सुंदर आकाशामुळे प्रसन्न होऊन गेले होते.
शेताकडे जात असताना पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती जणू ते आपला दिवसाचा प्रवास करण्यास सज्ज झाले होते. थोडे पुढे गेल्यावर छोट्या छोट्या ओढ्यांचा पाण्याचा वाहण्याचा आवाज येत होता. खूपच प्रसन्न वाटत होते. ती पहाट आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव देऊन गेली होती.