तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा
Answers
Answer:
चैत्र महिना:
चैत्र हे हिंदु दिनदर्शिकेतील एक महिना आहे.
चैत्र वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखला जातो - चैत्रचा पहिला दिवस नवीन वर्ष म्हणून महाराष्ट्रात गुढी पाडवा, तामिळनाडूमधील पुतंडू, कर्नाटकमधील उगादी आणि आंध्र प्रदेश म्हणून साजरा केला जातो.
चैत्र हा मार्च / एप्रिल महिन्यात वसंत .तूच्या प्रारंभाशी संबंधित आहे.
चैत्र महिन्यातील महत्त्वाचे सण म्हणजे चैत्र नवरात्र, राम नवमी हनुमान जयंती आणि चरक पूजा.
मला आशा आहे की यामुळे मदत होईल.
please mark as Brainliest
Answer:
वेगवेगळे ऋतू आणि त्या ऋतूंची वेगवेगळी रूपे, त्यांचे विभ्रम शहरात कधी दिसतच नाहीत. शहरातील वातावरण तसे निरंगी, फिकट, चैत्र अनुभवायचा असेल, तर गावीच गेले पाहिजे. आम्ही अनेकदा सहलीला गेलो आहोत, पण गावी गेल्यावर निसर्गाचा जो सहवास लाभतो, त्याचा आनंद अवर्णनीय असतो. सुदैवाने माझे काका आमच्या गावी राहतात. यामुळे वसंत ऋतूत गावी जाण्याचे भाग्य आम्हांला लाभते. तिथे गेल्यावर मन मोहित होऊन जाते. जे कधीही जाणवलेले नसते, ते सौंदर्य तिथे दिसते. कोणीही समजावून न सांगता दिसते.
आता हे चाफ्याचे झाड पाहा. वास्तविक, त्या झाडाच्या रूपात आकर्षक म्हणावा असा एकही घटक नाही. पण तोच पांढरा चाफा फुलांनी डवरल्यावर पाहा. मन लोभावतेच. आपण नकळत वाकून जमिनीवर पडलेले फूल उचलतो. पाकळ्यांवरून हात फिरवतो. आत डोकावून पाहतो. चिमूटभर हळदपूड अलगद सोडलेली असावी, तसा पिवळा रंग तिथे शोभून दिसतो. गडद पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांनी डवरलेली सुरंगी तर पाहतच राहावी. सूर्याचा प्रकाश पडताच, ती फुले पूर्ण उमलतात. सारे रान सुगंधाने भरून जाते. जिकडे पाहावे तिकडे कोवळी कोवळी हिरव्या रंगांची पाने आणि शेकडो रंगछटा लेवून बसलेली फुले! निसर्ग या विविध रंगांनीच आच्छादलेला असतो. हे मला आमच्या गावी कोकणात पाहायला मिळते. मी तर ठरवलेच आहे... मोठा झालो की कोकणातच कायम राहायचे.