तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्तीत राहनार आहात त्यासाठी मुख्या धापिकेला पत्र लिहा
Answers
Answered by
13
Answer:
तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात, त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा.
कु. योगिता जोग,
जुना आग्रा रोड,
पंचवटी, नाशिक – ४२२००४
दि . ८ जुलै २०१८
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
श्रीराम विद्यालय, नाशिक
सा. न. वि. वि.
मी कु. योगिता जोग इयत्ता ८ वी ( ब ) वर्गात शिकत आहे. दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आहे. लग्न पुण्याला आहे. लग्नासाठी आम्ही सगळे १२ डिसेंबरला जाणार आहोत व १८ डिसेंबरला परत येणार आहोत. त्यामुळे मला १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत शाळेतून रजा मिळावी ही विनंती. या काळात माझा बुडालेला अभ्यास मी मैत्रिणींच्या मदतीने पूर्ण करीन ही खात्री देते.
तरी मला रजा मिळावी ही विनंती.
आपली नम्र,
कु. योगिता जोग,
८ वी ( ब )
Explanation:
plz mark my answer in brainlist
Similar questions