Hindi, asked by deepak486444, 2 months ago

तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात, त्यासाठी मुख्याध्याकांना विनंती पत्र लिहा.​

Answers

Answered by jaiswalnilesh11
26

Answer:

मला आशा आहे की हे उत्तर तुम्हाला उपयुक्त ठरणार .

Attachments:
Answered by rajraaz85
18

Answer:

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

सरस्वती विद्यालय

मलाड पश्चिम -४०१९७०

दिनांक १४ जानेवारी २०२२

विषय- चार दिवसांच्या सुट्टी बाबत

महोदय,

         मी अविनाश पाटील इयत्ता दहावीतील विद्यार्थी असून मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या घरात लग्नकार्य असल्याने  मी पुढील चार दिवस शाळेत उपस्थित राहू शकत नाही. मला आपणास सांगण्यास खूप आनंद होत आहे की येत्या रविवारी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न कार्य आयोजित केलेले आहे. घरात बाबा एकटे असल्यामुळे या लग्नकार्याला पूर्ण करण्यासाठी माझ्या कुटुंबाला माझ्या मदतीची गरज आहे.

        पुढील चार दिवसात जे  काही माझ्या अभ्यासाचे नुकसान होईल मी खात्री देतो मी ते लवकरात लवकर पूर्ण करेन. शाळेत दिलेला सर्व विषयांचा गृहपाठ मी वेळेत पूर्ण करेन.

        मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझी अडचण समजून घेऊन मला पुढील चार दिवस अनुपस्थित राहण्याची परवानगी देणार. आपल्या सहकार्या बद्दल खूप खूप आभार.

तुमचा विद्यार्थी,

अविनाश पाटील

इयत्ता दहावी अ

Explanation:

Similar questions