World Languages, asked by BhumiMalu, 1 month ago

तुम्ही चातुर्याने तुमच्या मित्राला केलेल्या मदती बद्दल लिहा...?In Marathi please answer its urgent...​

Answers

Answered by bhushanzade81
0

कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र आजारी पडतात तेव्हा . . .

“माझ्या पप्पांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं होतं. त्यांना घरी नेण्याआधी आम्ही डॉक्टरांना विनंती केली की त्यांनी पप्पांच्या रक्त तपासणीचे रिपोर्ट पाहून घ्यावेत. डॉक्टरांना वाटलं सर्व रिपोर्ट नॉर्मल असतीलच आणि त्यांनी आम्हाला तसं आश्वासनही दिलं. पण रिपोर्ट पाहिल्यावर त्यांना कळलं, की दोन गोष्टींचं प्रमाण जास्त होतं. त्यांनी आमची माफी मागितली आणि लगेच एका तज्ज्ञाशी संपर्क केला. पप्पांची तब्येत आता बरी आहे, पण आम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारून खरंच खूप चांगलं केलं असं आता मला वाटतं.”—मरीबेल.

एक पत्नी आपल्या पतीला कायकाय त्रास होत आहे आणि कोणती औषधं चालू आहेत ते लिहीत आहे

कायकाय त्रास होत आहे आणि कोणती औषधं चालू आहेत हे डॉक्टरांना भेटण्याआधी लिहून काढा

डॉक्टरांकडे फेऱ्या मारणं आणि हॉस्पिटलमध्ये राहणं यामुळं खूप ताण पडू शकतो. अशावेळी एखादा मित्र किंवा नातेवाईक सोबत असल्यास किती मदत होऊ शकते आणि एखाद्याचा जीवही वाचू शकतो हे मरीबेलच्या अनुभवावरून कळतं. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कशी मदत करू शकता?

डॉक्टरांना भेटण्याआधी. पेशंटला कायकाय त्रास होत आहे आणि कोणती औषधं चालू आहेत हे लिहा. डॉक्टरांना कायकाय विचारायचं आहे तेही लिहा. पेशंट तुमचा मित्र असेल तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाला आधी असा त्रास झाला होता का, हे आठवायला मदत करा. या सर्व गोष्टी डॉक्टरांना माहीत असतीलच किंवा ते स्वतःहून विचारतील असा विचार करू नका.

एक जोडपं डॉक्टरांना भेटत असताना पत्नी काही गोष्टींची नोंद करत आहे

लक्ष देऊन ऐका, आदरानं प्रश्न विचारा आणि डॉक्टर काय सांगतात त्याची व्यवस्थित नोंद करा

डॉक्टरांसमोर असताना. डॉक्टर जे काही बोलत आहेत ते तुम्हाला आणि पेशंटला नीट कळत आहे, याची खातरी करा. त्यांना प्रश्न विचारा पण स्वतःचे विचार त्यांच्यावर थोपवू नका. पेशंटच्या मनात काही प्रश्न असतील तर ते त्याला विचारू द्या आणि स्वतः निर्णय घेऊ द्या. लक्ष देऊन ऐका आणि डॉक्टर काय सांगतात त्याची व्यवस्थित नोंद करा. उपचाराच्या आणखी काही पद्धती आहेत का, हेही विचारा. काही वेळा, पेशंटला दुसऱ्या डॉक्टरांकडं जाण्याबद्दल सुचवणं चांगलं असू शकतं.

डॉक्टरांबरोबर असताना लिहून घेतलेल्या गोष्टींची ते चर्चा करत आहेत

डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांची उजळणी करा आणि त्यांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी नीट वाचा

डॉक्टरांना भेटल्यानंतर. डॉक्टरांच्या भेटीत जे काही बोलणं झालं, याची पेशंटसोबत उजळणी करा. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यानं मेडिकलमधून बरोबर तीच औषधं आणली आहेत का याची खातरी करा. डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषधं घेण्याचं पेशंटला उत्तेजन द्या आणि औषधांमुळं काही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांना कळवण्यासही सांगा. पेशंटला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास आणि डॉक्टरांच्या काही सूचना असतील जसं की, पुन्हा दाखवण्यास सांगितलं असेल तर तसं करण्याचं उत्तेजन द्या. त्याच्या आजाराबद्दल आणखी माहिती मिळवण्यास त्याला मदत करा.

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करताना

एक स्त्री आणि तिच्या वतीनं बोलणारी जबाबदार व्यक्ती हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याशी बोलत आहे

सर्व फॉर्म अचूकपणे भरले आहेत याची खातरी करा

डोकं शांत ठेवा आणि सतर्क राहा. पेशंटला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करताना तो चिंतीत असेल आणि त्याला असाहाय्य झाल्यासारखं वाटत असेल. तेव्हा तुम्ही डोकं शांत ठेवून, सतर्क राहून काम केल्यानं इतरांनाही शांत राहण्यास मदत होईल आणि बऱ्याच चुकाही टाळता येतील. पेशंटला अॅडमिट करताना सर्व फॉर्म अचूकपणे भरले आहेत याची खातरी करा. पेशंटला त्याच्या आजाराविषयी आणि उपचाराविषयी सर्व नीट कळू द्या जेणेकरून तो स्वतः निर्णय घेऊ शकेल. तो खूप आजारी असल्यामुळं निर्णय घेऊ शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्रानुसार आणि त्याच्या जवळच्या नातेवाइकाच्या किंवा जबाबदार व्यक्तीच्या सूचनेनुसार उपचाराबाबत निर्णय होऊ द्या. *

एक स्त्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे आणि तिच्या वतीनं बोलणारी जबाबदार व्यक्ती डॉक्टरांशी बोलत आहे

पेशंटच्या शारीरिक किंवा मानसिक स्थितीत काही फरक जाणवल्यास ते आदरानं कर्मचाऱ्यांना सांगा

पुढाकार घ्या. बोलायला घाबरू नका. तुम्ही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी सभ्यपणे आणि आदरानं वागलात तर तेही पेशंटकडं जास्त लक्ष देतील आणि त्याची आणखी चांगली काळजी घेतील. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये, एका पेशंटवर वेगवेगळे डॉक्टर उपचार करतात. अशावेळी तुम्ही पेशंटबद्दल इतर डॉक्टरांनी किंवा नर्सेसनं काय म्हटलं ती माहिती पुढील डॉक्टरांना देऊ शकता. तुम्ही पेशंटला चांगलं ओळखत असल्यामुळं त्याच्या शारीरिक किंवा मानसिक स्थितीत काही फरक जाणवल्यास तेही त्यांना सांगू शकता.

पेशंट बरी झाल्यावर तिच्या वतीनं बोलणारी जबाबदार व्यक्ती एका नर्ससोबत बोलत आहे

कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय न आणता तुमच्या परीनं मदत करा

आदर दाखवा आणि आभार माना. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा खूप तणावपूर्ण वातावरणात काम करावं लागतं. तुम्ही त्यांच्या जागी असता तर तुम्ही इतरांकडून जशी अपेक्षा केली असती, तसं त्यांच्याशी वागा. (मत्तय ७:१२) त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांच्याकडं असलेल्या अनुभवासाठी त्यांचा आदर करा; त्यांच्या क्षमतेवर भरवसा ठेवा आणि ते करत असलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभार माना. तुम्हाला त्यांच्या कामाची कदर आहे हे पाहून त्यांना मनापासून काम करण्याचं उत्तेजन मिळेल.

आपल्यातील कुणालाही आजारपण टाळता येत नाही. पण काही गोष्टींची पूर्वतयारी करण्याद्वारे आणि व्यावहारिक मदत पुरवण्याद्वारे तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाइकाला कठीण प्रसंगातून निभावण्यास मदत करू शक

Similar questions