तूम्ही गेलेल्या पावसाळी सहलीबद्दल तूमचे अनूभव लिहा
Answers
Answer:
please English sai likhe aur wait please
गाडी थांबताच पावसाचे मोठमोठे थेंब अंगावर पडू लागले. फक्त मुलं आणि काही मोठी माणसं धावतच हॉटेलमध्ये शिरली. जोरदार पावसाला सुरुवात झाली. बघता बघता हॉटेलचा बाहेरचा भाग जलमय झाला.
दिलीप, आमच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला आम्ही एक टेंपो ट्रॅक्स करून गेलो होतो. दुपारचं लग्न आटपून दुपारी चार वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. येताना सांगलीचा गणपती करायचा की नाही, यावर वाद झाला. अखेर उशीर होईल या कारणानं तसेच निघालो. दुपारचं लग्नाचं जेवण दोन वाजता झालं होतं. त्यामुळे भूकही नव्हती. आमचा प्रवास सुरू झाला.
साधारणपणे सातारच्या आसपास मुलांना भुका लागल्या. पावसाळी वातावरण असल्यामुळे कुठेतरी गरमागरम चहा प्यावा, अशी सर्वांना इच्छा झाली. आम्ही हॉटेल पाहून थांबलो. सगळीकडे अंधारून आलं होतं. गाडी थांबताच पावसाचे मोठमोठे थेंब अंगावर पडू लागले. फक्त मुलं आणि काही मोठी माणसं धावतच हॉटेलमध्ये शिरली. जोरदार पावसाला सुरुवात झाली. बघता बघता हॉटेलचा बाहेरचा भाग जलमय झाला. बाहेरील खुर्ची-टेबलं तरंगू लागली. मधूनच विजांचा कडकडाट सुरू झाला. आमची भीतीमुळे गाळण उडाली.
गाडीत आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि एक-दोन बाळं होतो. आम्ही रामरक्षा, मारुती स्तोत्राचा धडाका लावला. छोटी बाळं रडू लागली. त्यातच शॉर्ट सर्किट होऊन हॉटेलचे दिवे गेले. अंधुक प्रकाशात आम्हाला पुसट दिसत होतं. एक-दोन स्कूटरस्वार तरंगत तरंगत आले आणि त्यांच्या गाड्या तशाच टाकून आत पळाले. एकदम कडकडाट झाला आणि आमच्या समोरील भलं मोठं झाड कोसळलं. झाडाखाली पार्किंग केलेल्या गाड्यांचा चुराडा झाला. आम्ही मोठमोठ्यानं मुलांना हाका मारत होतो. हॉटेलमधील मंडळी आम्हाला हाका मारत होती. मुलं एकीकडे रडत होती. आमची गाडी तरंगायला लागली. आम्हाला वाटलं आता इथंच जलसमाधी मिळणार; पण अखेर हळूहळू पावसाचा जोर कमी झाला.
हॉटेलमधील मंडळी व मुलं धावतच गाडीत आली आणि आमच्या जीवात जीव आला. देवाचं नाव घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत अनेक झाडं उन्मळून पडली होती. हळूहळू वाट काढत आम्ही रात्री दहा वाजता पुण्यात पोहोचलो. सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेतलं. सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या. तिथल्या स्टॉलवर पावभाजी खाल्ली आणि हुश्श करत आपापल्या घरी परतलो. अजूनही पावसाळ्यात या सहलीचा थरार सगळ्यांना आठवतो.