World Languages, asked by vinod6042, 3 months ago

तुम्ही गावाला सुखरूप पोहोचलात प्रवास चांगला झाला हे पत्राने आईला कळवा मराठी पत्र लेखन

Answers

Answered by pratishtha25
7

२५- गणेश कॉलनी,

रत्नागिरी.

१६ एप्रिल २०२१

प्रिय आई

सप्रेम नमस्कार

काल संध्याकाळी पाच वाजता आता मी गावी सुखरूप पोहोचलो. प्रवास अतिशय आरामदायक झाला. आजोबा मला बस स्टँड वर घेण्यासाठी आले होते. सहा वाजता आम्ही घरी पोहोचलो.

इथे आजी-आजोबा सुखरूप आहेत. मी त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या कामात मदत करीन. तू इथली काळजी करू नकोस. मला तुमची सर्वांची आठवण येते पत्रातून आपण बोलतच राहूच.

बाबांना सुट्टी पडली की तुम्ही पण गावी या. आपण एकत्र खूप मजा करू.

बाबांना माझा प्रणाम व लहान नेहाला माझे प्रेम. काळजी घ्या. माझी काळजी नसावी.

कळावे.

तुझा आज्ञाधारक,

मोहित

Similar questions