'तुम्ही केलेला जंगल प्रवास' चा अनुभव थोडक्यात लिहा.
Answers
Explanation:
मनाने लिहून टाक!!
Answer:
माझा पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्यातील प्रवास अविस्मरणीय होता. आम्ही भर पावसात ट्रेक करण्यासाठी भीमाशंकरला गेलो होतो. वर टेकडीवर शंकराचे मंदिर पाहिल्यावर आम्ही आजूबाजूचा वन्य परिसर पाहिला. घनदाट झाडी, अनेक प्रकारची झाडे आणि पक्षी - पाखरांच्या आवाजात आम्ही जंगलाची पायवाट तुडवत होतो. महाराष्ट्राचे मानचिन्ह मानले जाणाऱ्या शेकरू या प्राण्याचे भीमाशंकर हे माहेरघर आहे. त्यामुळे, शेकरू दर्शनाची आम्हांला ओढ लागली होती. शेकरू व्यतिरिक्त या जंगलात बिबट्या, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, साळींदर, लांडगे, वानर, मोर यांसारखे वन्यजीवही वास करतात. त्यामुळे, आम्ही सावधपणे पुढे जात होतो.
जोराचा पाऊस होता, अशावेळी प्राणी शक्यतो बाहेर पडत नाहीत, त्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. दुपारहून पाऊस ओसरला. आम्ही थोड्या मोकळ्या भागात विश्रांतीसाठी थांबलो. जवळपास जांभूळ, बोरांची झाडे होती. मध्येच झाडांची पाने सळसळली, त्या दिशेने पाहिले तर दोन शेकरू एका उंच झाडावर चढत होते. वर त्यांचे घरटे असावे. ती नर मादीची जोडी होती. शेकरू अतिशय गोंडस दिसतो व थोडा घाबरट, लाजाळू असतो. ते माणसांच्या जवळ येत नाही. आम्हांला पाहून ते शेकरू जे झाडावर चढले ते खाली उतरलेच नाहीत; पण भीमाशंकरला येण्यामागची आमची इच्छा पूर्ण झाली होती. आम्हांला शेकरूदर्शन झाले होते !
Explanation: