तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आई बाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणीचा एखादा प्रसंग लिहा
1
Answers
Answer:
मी लहान असतानाची एक गम्मत सांगते. त्यावेळी आमचे स्वतःचे घर नव्हते. आम्ही भाड्याने राहत असू. घरासमोर मोठे अंगण होते. माझे आई बाबा दोघेही नोकरी करत. दिवसभर घरी मी आणि आजी राहत असू. आमच्या गावात गुरुवारी तांदळाचा बाजार भारत असे. तर अश्याच एका गुरुवारी बाबांनी तांदूळ आणून ठेवले आणि ते कामाला गेले. जेवण वगैरे झाल्यावर मी खेळत बसले आणि आजी ला डोळा लागला. मला नादी लावण्यासाठी आजी बऱ्याचदा चिमण्यांना तांदूळ टाकत असे व चिमण्यांना दाणे टिपताना पाहून मला फार मज्जा वाटे . तर त्या दिवशी मी आजीला विचारले ,"आजी चिमण्यांना तांदूळ टाकू ?" ती बिचारी मस्त झोपेत होती मी बाहेर उन्हात जाऊ नये म्हणून ती झोपेतच हो म्हणाली. मग काय विचारता, आजीनेच परवानगी दिल्यावर मी मांडणीतून एक वाटी घेतली आणि हळू हळू तांदूळ "चिमण्यांना" टाकायला सुरवात केली. आजी उठेपर्यंत माझे हे काम अविरतपणे सुरु होते आणि अंगणात तांदळाची एक मस्त लादी तयार झाली होती. आजी ने उठल्यावर डोक्याला हात मारून घेतला. त्यानंतर बिचारीने ते तांदूळ निवडून धुवून टाकले. संध्याकाळी आई आल्यावर आई ने धुतलेले तांदूळ पहिले. आजी ला अनारसे आवडत पण इतक्या तांदळाचे अनारसे का करायचेत हे आईला समजेना. यथावकाश तिला सर्व प्रकार समजला व तिने मला विचारले ,"बेटा, का टाकलेस इतके तांदूळ बाहेर ?" त्यावर अतिशय नम्र बालकाप्रमाणे मी उत्तर दिले "मी आजी ला विचारलं होत, ती टाक म्हणाली म्हणून टाकले :)"