India Languages, asked by harsh101111, 11 months ago

तुम्हाला कोण व्हावेसे वाटते​

Answers

Answered by minal85
41

मला भविष्यात एक यशस्वी software engineer व्हावेसे वाटते. पण याही शिवाय मला एक उत्तम आणि समाधानी व्यक्ती व्हायचे आहे. कारण मी पैसा, प्रतिष्ठा, मान-सन्मान हे सर्व तर माझे स्वप्न पुर्ण झाल्यावर मिळवेनच, पण हे सर्व मिळवल्यावर मला जे समाधान मिळेल यावरूनच मी एक उत्तम व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखले जाईल.

Answered by halamadrid
26

■■ तुम्हाला कोण व्हावेसे वाटते? ■■

● मला भविष्यात एक शिक्षक व्हावेसे वाटते.

● शिक्षक बनल्यावर मला गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचे आहे.

● मी सगळ्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता शिकवायचा प्रयत्न करेन व त्यांच्या सगळ्या शंका दूर करेन.

● शिक्षक बनून मी विद्यार्थ्यांना चांगली मानवी मूल्ये शिकवणार, त्यांचा आत्मविश्वास वाढवणार, त्यांचा व्यक्तिमत्व विकसित करण्याचा प्रयत्न करणार.

● देशासाठी चांगले व जागृत नागरिक तयार करण्याची जबाबदारी एका शिक्षकावर असते आणि ही जबाबदारी मी ईमानदारीने पार पाडेन.

Similar questions