तुम्हाला निरंजन अशी मैत्री करायला आवडण्याची व न आवडण्याची कारणे स्पष्ट करा
Answers
Answered by
20
प्रश्न :-
तुम्हाला निरंजन अशी मैत्री करायला आवडण्याची व न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तर :-
निरंजन हा अतिशय समंजस परिस्थितीशी खंबीरपणे लढणारा मुलगा आहे. कठीण परिस्थितीत ही तो कष्ट करत अभ्यासात प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे गुण पाहून कोणालाही त्याच्याशी मैत्री करावीशी वाटेल. या सोबतच निरंजन मध्ये इतर ही अनेक गुण आहेत. कष्टाळू असण्याबाबतच आदर्श नागरिक आहे. इतरांवर येणारे संकट जाणवताच त्यावर लगेच योग्य ती कृती करण्याचे प्रसंगावधान व मनाचा मोठेपणा त्याच्या कडे आहे. दुसऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून धडपडणारा असा हा मुलगा आहे. या सर्व कारणांमुळेच स्वार्था पलीकडे जाऊन हिताचा विचार करूणारा निरंजन मला मित्र म्हणून नक्कीच आवडेल.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Similar questions