India Languages, asked by AustinBhai, 1 month ago

तुम्ही लहान भावाला| बहिणी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा. fast pls I have 5 mins

Answers

Answered by Sauron
35

अचूक प्रश्न :

तुमच्या लहान भावाला / बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.

उत्तर :

(अनौपचारिक पत्र)

बी - 905,

प्रभात कॉलनी

अंधेरी (पश्चिम)

मुंबई - 411002

दिनांक - 10 जुलै 2021

प्रिय हर्षवर्धन,

कसा आहेस तु? मी इकडे चांगली आहे तू तिकडे व्यवस्थित असावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. हर्षु प्रथमत: तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात कधी दुःखाचा प्रवेश न होवो आणि यश, कीर्ती व समृद्धीचा आलेख निरंतर वाढत राहो हेच परमेश्वराशी मागणे आहे.

मला माहित आहे की तु माझी वाट पाहत असशील, पण मला काही शैक्षणिक कारणास्तव वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. अपेक्षा करते की तु मला समजून घेशील. हो पण तू काळजी करू नकोस तुझ्यासाठी भेटवस्तू पत्रा सोबत पाठवत आहे. ज्याची तू हमखास वाट पाहतो. आशा करते ती तुला आवडेल.

आई बाबा कसे आहेत त्यांना नमस्कार सांग आणि अभ्यासाकडे लक्ष दे. बाकी सारे भेट झाल्यावर बोलू.

पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत पत्राचा शेवट करते ‌. भेट वस्तू कशी आहे हे सांग पत्राचे उत्तर जरूर दे.

तुझीच लाडकी दीदी,

गौरी

Answered by sawantrohan640
1

Answer:

मइ माझ्या भावाला पत्र पाठवले आज

Explanation:

happy birthday bau

Similar questions