तुम्ही पाहिलेल्या 1 पर्यटन स्थळ विषयी माहिती लिहा ?
Answers
Answered by
3
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले पर्यटन स्थळ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये आंबोली या पर्यटन स्थळा विषयी माहीती देण्यात आली आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत घालवलेले ते सोनेरी क्षण या निबंधात दर्शविले आहेत ते तुम्हाला लक्षात येईलच . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
माझे एक काका सावंतवाडीला राहतात. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काकांकडे गेलो होतो. आम्ही सर्वचजण आल्यामुळे काका आनंदात होते. मोठ्या उत्साहात त्यांनी आम्हांला संपूर्ण सावंतवाडीचे दर्शन घडवले. एके दिवशी त्यांनी आंबोलीला जाण्याचा बेत जाहीर केला आणि आम्हा मुलांमध्ये उत्साहाची लाटच पसरली. वास्तविक मी पूर्वी आंबोली पाहिले आहे. परंतु हे डोंगरमाथ्यावरील सुंदर गाव पुन्हा पाहायला मिळणार, याचा मलाही खूप आनंद झाला होताच.
Mark As Brain list
Similar questions