Physics, asked by shivsaijagdale, 1 month ago

तुम्ही पाहिलेल्या अंतर्गोलीय आरशाचा वापर करून तयार केलेल्या उपकरणांची नावेलिहा.​

Answers

Answered by himanideore6
7

Answer:

आरसा  हा एक काचेचा प्रकार असून त्याचा एक पृष्ठभाग परावर्तनी असतो. पृष्ठभागानुसार आरशांचे सपाट आरसा आणि गोलीय आरसा असे दोन प्रकार पडतात.

सपाट आरसा (Plane Mirror) :

सपाट आरसा म्हणजे काचेचा सपाट पृष्ठभाग असून त्याला परावर्तनी बनविण्यासाठी एका बाजूला जस्त आणि पारा (Amalgum) या संमिश्राचा थर दिलेला असतो. हा थर टिकविण्यासाठी त्यावर लाल किंवा इतर रंग दिलेला असतो

सपाट आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा image formed by plane mirror

सपाट आरशामध्ये वस्तूची प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते

प्रतिमा आभासी आणि सुलट असते तसेच प्रतिमेचा आकार मूळ वस्तूच्या आकारा इतकाच असतो

आरशासमोर वस्तू जेवढे अंतरावर असते तेवढ्याच अंतरावर आरश्या मागे प्रतिमा तयार होते

सपाट आरसा तयार झालेल्या प्रतिमांमध्ये बाजूंची अदलाबदल होते म्हणजेच आपली डावी बाजू आरशात उजवी तर उजवी बाजू डावी आहे असा भास होतो

सपाट आरशामध्ये वस्तूची संपूर्ण प्रतिमा तयार होण्यासाठी आरशाची उंची वस्तूच्या उंचीपेक्षा अर्धी निम्मी असणे आवश्यक असते

जेव्हा दोन आरसे परस्परांना समांतर ठेवले जातात तेव्हा त्या दोन्ही आरशांमध्ये वस्तूच्या अनंत प्रतिमा तयार होतात

जेव्हा दोन सपाट आरसे परस्परांशी काटकोनात म्हणजेच 90° च्या कोनात ठेवलेले असतात तेव्हा त्या दोन्ही आरशात वस्तूच्या एकूण तीन प्रतिमा तयार होतात

दोन आरशांमध्ये असलेल्या विविध कोनांच्या मापांसाठी तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या वेगवेगळी असते ती संख्या ठरविण्यासाठी खालील सूत्र वापरतात

एकूण प्रतिमांची संख्या = 360/ दोन आरशातील कोनाचे माप – 1

गोलीय वक्र आरसे (Spherical / Curved Mirrors) :

गोलाकार परंतु पोकळ काचे पासून तयार केलेल्या वक्र पृष्ठभागांना गोलीय आरसा असे म्हणतात हे वक्र पृष्ठभाग आतल्या किंवा बाहेरील वक्र बाजूने परावर्तन बनविण्यासाठी त्यावर संमिश्र यांचा लेप दिला जातो गोलिया आरशांचा प्रत्येक भाग म्हणजे एक वर्तुळ पाकळी असते गोली आरशांचे अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसे असे दोन प्रकार पडतात

अंतर्वक्र आरसा

या आरशाचा आतील पृष्ठभाग परिवर्तनासाठी वापरला जातो

बहिर्वक्र आरसा आरसा

या आरशाचा बाहेरील भाग पृष्ठभाग परिवर्तनासाठी वापरला जातो

महत्वाच्या संज्ञा

एक वक्रता केंद्र आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या

मुख्य अक्ष (Principal Axis) : आरशाचा ध्रुवा आणि वक्रता केंद्र यामधून जाणाऱ्या सरळ रेषेला आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात

नाभीय बिंदू (Focal Point) : अंतर्वक्र आरशावर मुख्य अक्षाला समांतर पडणारी  प्रकाश किरणे परावर्तनानंतर

मुख्य अक्षावरील एकाच बिंदूत एकत्र येतात. त्याला अंतर्वक्र आरशाचा नाभीय बिंदू असे म्हणतात. याला F या चिन्हाने दर्शवितात. अंतर्वक्र आरशाचा नाभीय बिंदू डावीकडे असतो.

नाभीय अंतर – अंतर्वक्र आरसा (Focal Length) :

आरशाचा ध्रुव आणि नाभीय बिंदू यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात.

चिन्ह – f

अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते.

Explanation:

PLEASE MARK AS BRIANLIST

Similar questions