Math, asked by hardikgadiya, 1 year ago

तुम्ही पाहिलेल्या एखाद्या शेताचे वर्णन थोडक्यात करा. आपला अनुभव सविस्तर मांडा व त्या अंतर्गत येणारे प्रश्न विचारा​

Answers

Answered by XxBrainlySultanxX
23

Step-by-step explanation:

मी पाचवीला असताना माझ्या गावी गेली होती.तेव्हा मी पहिल्यांदाच गावाकडचे शेत पाहिले.त्याआधी शेतांना फक्त पुस्तकांमध्ये किंवा टीव्हीवर पाहिले होते.प्रत्यक्ष शेत पाहण्याचा माझा हा पहिला अनुभव खूप खास होता.

माझ्या मामाचे भाताचे एक मोठे शेत आहे.ते पाहायला मी माझ्या भावंडांसोबत गेले होते.भाताच्या पिकांची कापणीची वेळ असल्यामुळे संपूर्ण शेत हिरवेगार दिसत होते.ते हिरवेगार दृश्य पाहून माझे मन प्रसन्न झाले.शेतामध्ये पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी एक बुजगावणं उभारलेले होते.जवळच एक झोपड़ी होती.तिथे शेताचे राखण करणारे आमचे माने काका राहतात.झोपडीत शेतीसाठी उपयोगी औजार,यंत्रे,जंतुनाशके ठेवली गेली होती.

जवळच शेताच्या कामासाठी उपयोगी बैल,ट्रैक्टर होते.शेतापासून काही अंतरावर एक तलाव होते.आम्ही तलावाच्या कडेला जाऊन थोडा वेळ बसलो.शेताच्या जवळच आंब्यांची झाडे होती.त्यामधील एका झाडाला दोन झोपाळे बांधले होते.त्या झोपळ्यांवर बसून आम्ही खूप मजा केली.

पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि आमची घरी निघण्याची वेळ झाली.

असा हा,माझा शेत पाहण्याचा अनुभव खूप आनंददायी होता.

Answered by Anonymous
3

Step-by-step explanation:

हिरवेगार दृश्य पाहून माझे मन प्रसन्न झाले.शेतामध्ये पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी एक बुजगावणं उभारलेले होते.

  • जवळच एक झोपड़ी होती.

  • तिथे शेताचे राखण करणारे आमचे माने काका राहतात.

  • झोपडीत शेतीसाठी उपयोगी औजार,यंत्रे,जंतुनाशके ठेवली गेली होती.

Similar questions