तुम्ही पाहिलेल्या जत्रेच्या प्रसंगाचे लेखन पुढील मुद्द्याच्या आधारे करा.
जत्रेचे ठिकाण,
घरी परतणे,
आजूबाजूची दृश्ये,देवीचे देऊळ, भक्तांची गर्दी, जत्रेतील खेळ
Answers
मी पाहिलेली जत्रा:
माझ्या बाबांच्या गावी कोल्हापुरला अंबाबाईचे एक मोठे देऊळ आहे.दरवर्षी या देऊळाजवळ एक मोठी जत्रा भरते.ही जत्रा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील बरेच लोक येतात.
गेल्या वर्षी,माझ्या बाबांनी मला या जत्रेला नेले होते.जत्रेत लोकांची खूप गर्दी जमलेली होती.देऊळ छान सजवले गेले होते.फुलांनी देवीची मूर्ती सजवली होती.देऊळात रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. देऊळासमोर एक मोठी रांगोळी काढली होती.तिथे खूप सारे दिवे लावलेले होते.
जात्रेत मुलांना खेळण्यासाठी अनेक खेळ होते.जादूगराचे खेळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.एक ठिकाणी मदारी माकडांचा खेळ करत होता.झटपट फोटो काढण्यासाठी एक ठेला होता.आम्ही तेथे फोटो काढला.
जत्रेत वेगवेगळी मिठाई,खेळणी,भांडी,पूजेचे सामान,कपड़े,सजावटीच्या वस्तू विकण्यासाठी अनेक दुकाने मांडली होती.तिथे बरेच पाळणेसुद्धा होते.
जत्रेत आनंदमय वातावरण होते.मला तिथे खूप मजा आली.
know more:
1. https://brainly.in/question/11942562
मी पाहिलेली जत्रा, आमच्या गावची जत्रा मराठी निबंध, भाषण