तुम्ही पाहिलेल्या, तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही
स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. (in big)
It's urgent
Answers
Answer:
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन, चांगले कपडे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. आणि जर गोष्ट बाहेर फिरण्याची असेल तर व्यक्ती कधीही नाही म्हणत नाही. बाहेर फिरायला प्रत्येकालाच आवडते. आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, बाहेर फिरण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. पण जर कधी कोणाला आपल्या शहराबाहेर पर्यटन म्हणून जाण्याची संधी मिळाली, तर प्रत्येकालाच आनंद होतो. पर्यटन फिरायला जाण्याने शरीराचा सर्व थकवा निघून जातो व जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो.
आपल्या भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत जेथे फिरायला जाऊन आपण जीवनाचा खरा आनंद मिळवू शकतो. परंतु मी पाहिलेल्या पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण कश्मीर आहे. मी यावर्षी माझ्या कुटुंबासोबत काश्मीरला गेलो होतो. जसेही आमच्या गाडीने घाटाच्या सीमेत प्रवेश केला, पृथ्वीच्या या स्वर्ग सौंदर्याला पाहून मी थक्क झालो. कोणीतरी म्हटले आहे की कश्मीर भारताचे स्विजरलैंड आहे. तेथे गेल्यावर मला ही गोष्ट खरी जाणवली, खरोखर काश्मीरच्या घाट जगातील सर्वाधिक मोहक आणि रमणीय स्थळ आहे. हे विशाल स्थान हिमालयाच्या मध्यात स्थित आहे. काश्मीर देवतांचे निवासस्थान आहे, येथे विपुल प्रमाणात फळे-फुले, वनस्पती आणि जीवजंतू आढळतात.
याशिवाय येथे अनेक ऐतिहासिक स्मारक, सुंदर चित्राप्रमाणे दिसणारे स्थळ, रम्य दृश्य व हिरवी जंगले आहेत. काश्मीर मध्ये अनेक मंदिरे, देवी-देवता व साधुसंत निवास करतात. येथील नागमोडी वळणाच्या नद्या, मोठमोठे तलाव, विशाल झरणे, बर्फाने झाकलेली पर्वते, सुरुची षैवृक्ष व सुंदर बगीचे काश्मीरच्या सौंदर्यात अधिकच भर करतात. निशात बाग, चंदन बारी, अनंतनाग, चष्मे शाही, नागिन लेक व शालिमार बाग येथील प्रसिद्ध दर्शनीय स्थळ आहेत