Geography, asked by rjjadhav1979, 5 days ago

१) तुम्ही पाहिलीत घराचं प्रकार लिहा.

Answers

Answered by abinsam2161
3

Answer:

घरांचे प्रकार – भाग १ : बांधकामाच्या मजबूतपणावर आणि स्वरूपावर आधारित घरांचे असे वर्गीकरण करता येईल. हे वर्गीकरण साधारणपणे घरांचा टिकाऊपणा, घरबांधणीसाठी वापरलेली साधनसामग्री आणि तंत्रज्ञान यावर अवलंबून आहे. भारतात जनगणना करताना, घरांचे सर्वेक्षण करताना हे वर्गीकरण वापरले जाते.

१) कच्ची घरे

२) तात्पुरती घरे

३) पक्की घरे

कच्ची आणि पक्की हि दोन्ही स्वरूपाची घरे भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात बघावयास मिळतात. परंतु, त्याचे स्वरूप आणि घरबांधणीसाठी वापरलेलं साहित्य यात मात्र फरक पडतो.

कच्च्या घराचा प्रकार

१) कच्ची घरे : भारतासारख्या कृषिप्रधान देशात ग्रामीण भागात कच्ची घरे मोठ्या प्रमाणात बांधली जात. आजही अशी घरे ग्रामीण तसेच आदिवासी भागात आढळतात. तसेच शहरी भागातही कच्ची घरे बांधली जातात. परंतु त्याची रचना, घरबांधणीसाठी वापरलेलं साहित्य यात तफावत दिसून येते. परंपरागत कच्ची घरे ही साधारणतः कुडाच्या भिंती, त्यावर माती आणि शेणाचे लिंपण, लाकडी तुळया, त्यावर झावळ्यांचे किंवा गवताच्या गंजीचे छत आणि माती व शेणाने सारवलेली जमीन अशा स्वरूपाची असतात. अर्थात, भौगोलिक प्रदेशानुसार तिथे स्थानिकरित्या उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसामग्री, स्थानिक लोकांचे परंपरागत बांधकाम कौशल्य वापरून तिथल्या हवामानास अनुकूल अशी घरे बांधली जातात. त्यामुळेच, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात वेगवेगळी लोकवास्तुकला आढळून येते. लोकवास्तुकला हा वास्तुकलेतला एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असून त्यावर बरेचसे संशोधनही झालेले आहे. कच्च्या घरांचं आयुष्य कमी असतं असा एक ढोबळ समज जरी असला (आणि बहुतांशी तो खरा आहे), तरीही लोकवास्तुकलेनुसार बांधलेली काही घरे बराच काळ टिकतात.

Similar questions