India Languages, asked by kingumesh60, 29 days ago


४)तुम्ही सुट्टीत ज्या गोष्टी करता त्याचे वर्णन करून लिहा.​

Answers

Answered by kaverikasabe
2

Answer:

सुट्टी लागून आठवडा पूर्ण होईपर्यंत या प्लॅनचाही पुरता बोजवारा उडालेला असतो आणि हाताला काही क्रिएटिव्ह काम नसलं तर काहीसा कंटाळाही यायला लागतो. हाच कंटाळा घालवण्यासाठी कोणत्या धम्माल गोष्टी करता येतील, याबाबत...

परीक्षा संपून उन्हाळ्य ाची सुट्टी लागली की, शाळेच्या दिवसाचं रूटीन पार कोलमडतं. खरं तर सुट्टी लागण्यापूर्वीच सुट्टीत कोणत्या वेळी काय करायचं, याची यादी तयार झालेली असते. पण सुट्टी लागून आठवडा पूर्ण होईपर्यंत या प्लॅनचाही पुरता बोजवारा उडालेला असतो आणि हाताला काही क्रिएटिव्ह काम नसलं तर काहीसा कंटाळाही यायला लागतो. हाच कंटाळा घालवण्यासाठी कोणत्या धम्माल गोष्टी करता येतील, याबाबत...

छंद वर्ग : वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळे छंद वर्ग आयोजित केले जातात. चित्रकला, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, पॉट पेंटिंग, लिखाण, वाचन, क्ले मॉड्युलिंग, ओरिगामी, पेपर क्विंलिंग अशा अनेक प्रकारचे छंद वर्ग घेण्यात येतात. यामधील तुम्हाला रुची असणाऱ्या छंदासाठी प्रवेश घेतलात, तर काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंद मिळेल. मन छान रमेल. •उन्हाळी शिबीर : खेळायची आवड असणाऱ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ - २० दिवसांची क्रीडा शिबिरे भरवली जातात. बँडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, स्केटिंग, टेनिस, कॅरम, बुद्धिबळ अशा वेगवेगळ्या खेळांची प्राथमिक माहिती यातून मिळते. शिवाय नवीन खेळांची माहिती करून घेण्यासाठी अशा शिबिरांचा उपयोग होईल. खेळांप्रमाणेच अभिनय आणि वादन शिबिरांनाही प्रवेश घेता येईल. •वाचन वर्ग : वाचनाची गोडी लहानपणापासून लागावी, म्हणून वाचन वर्ग होतात. यात काय वाचावं? कसं वाचावं? तसंच उच्चारण शुद्धतेबद्दल, माहिती दिली जाते. थोडक्यात योग्य वाचनाची दिशा दाखवली जाते. संस्कृतची आवड असेल, तर १५ दिवसांचे संस्कृतचे वर्गही लावता येतील. याचा पुढील आयुष्यातही चांगला उपयोग होईल. •श्रम संस्कार शिबीर : दर उन्हाळी सुट्टीत चंद्रपूरच्या आनंदनवनात 'श्रम संस्कार शिबीर' होतात. श्रमाचं महत्त्व पटवून देणं शिवाय शेती करणारी तिथली माणसं कसं जीवन जगतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं, हा या शिबिराचा मूळ उद्देश असतो. निसर्गाच्या कुशीत राहणारी ही माणसं जाणून घेण्याचा अनुभव वेगळाच. •मनसोक्त खेळा : रोज शाळा आणि क्लासेस अशा रूटीनमुळे खेळणं कमी होतं. तेव्हा सुट्टीत कुठल्याही क्लास किंवा शिबिराला जायचं नसेल, तर मनसोक्त खेळून घ्या. शिबिरात जाऊन मार्गदर्शनाखालीच खेळलं पाहिजे, असंही नाही. अलीकडे उन्हाळा वाढल्याने दिवसा मैदानी खेळ खेळणं टाळा. पण त्यावेळी सगळ्या मित्र-मैत्रिणींना एकत्र जमवून कॅरम, पत्ते, सापशिडी, अंताक्षरी असे बैठे खेळ खेळता येतील. आधीच्या पिढीतील कोणाकडून सागर गोटे आणि काचापाणी असे खेळही शिकता येतील.•भटकंती करा : उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मामाचं गाव असं समीकरणच असतं. पण त्याचबरोबर स्वतःच्या शहरातही फिरा. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अनेक म्युझियम्स, किल्ले आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदीच समुद्र किनाऱ्यांवर मारलेला फेरफटकाही मन प्रसन्न करतो.

Answered by ahirwardeepak8435
0

Answer:

डोळे

संपत्ती

Explanation:

गच्च सदस्य

Attachments:
Similar questions