तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर उन्हाळी सुट्टी कशी व कुठे घालण्यात याविषयी संवाद तयार करा
Answers
रामनारायण शाळेमध्ये आज आठविथील मुलांचा शेवटचा पेपर. ह्या पेपर नंतर मुलांना दोन महिन्यांची उन्हाळ्याची सुट्टी मिळणार होती. पेपर संपल्यानंतर रामू आणि राज हे घरी एकत्र गाडीने जात होते. हा एक त्या दोघांमधला संवाद.
रामू: किती छान पेपर होता ना ?
राज: हो रे, जे आपण वाचलेला ते सगळं आलं आपल्याला.
रामू: मला तर पेपर कधी संपतोय आणि कधी सुट्टी पडते असे वाटत होते.
राज: हो मला पण तसेच काही तरी होत होते
रामू: मग सुट्टीमध्ये कुठे जाणार आहेस का ?
राज: असा काही ठरवले नाही आहे पण घरीच असीन! आणि तू ?
रामू: मी पुडच्या आठवड्यात गावाला जाऊन येईन मग मी मोकळाच आहे
राज: एक काम करूया तू आल्यानंतर आपण एकत्र फिरू!
रामू: हो नक्की, मी यादी आधीच बनवली आहे. चौपाटी, गार्डन, मत्सालय हे आपण एका दिवसात करू!
राज: हो नंतर आपण गड किल्यांना भेट देऊ आणि ट्रेक करू.
रामू: आणि नंतरचे दिवस उन्हाळी अभ्यास करू थोडा
राज: काय मस्त प्लॅन आहे! चल तुझं घर आल!
नंतर भेट मला माझ्या घरी
रामू: हो बाय!